रोटरी विश्वनाथ हेल्थ फाऊंडेशन माध्य मातून सुसज्ज धर्मादाय सर्व चिकित्सालय


डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी विश्वनाथ हेल्थ फाऊंडेशन माध्यमातून सुसज्ज धर्मादाय सर्व चिकित्सालयाचा  शुभारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, अनिकेत घमंडी, डॉ. अरुण पाटील, डॉ. अनघा हेरूर आदी उपस्थित होते.रोटरी विश्वनाथ हेल्थ फाऊंडेशनच्या या उपक्रमासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी निधी दिला असून त्याचा उपयोग या सुसज्ज ओपोडीसाठी झाला आहे. 


या ओपीडी माध्यमातून दंत चिकित्सा, सुसज्ज नेत्र चिकित्सा, अद्ययावत पॅथॉलॉजी आणि इमोझिंग सेवा मिळणार आहे. याबाबत डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, या ओपीडीमधून कमी दराने सेवा दिली जाणार आहे. रोटरी विश्वनाथ हेल्थ फाऊंडेशन संस्थेने अशा प्रकारची सेवा सुरू केल्यामुळे भविष्यात अनेक संस्थाही अशा कार्यात पुढे येतील आणि त्याचा फायदा गरजू रुग्णाना होईल. श्री गोविंदनंद श्रीराम मंदिर येथे ही सेवा सुरू झाली असून ती नक्कीच गरजूंसाठी उपयोगी ठरेल.

Post a Comment

0 Comments