पालकांनो मुलांना विचारशक्ती द्या - ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ आव्हाड सार्वजनिक वाचनालयाच्या बाल शिबिराचा समारोप


कल्याण : पालकांनी मुलांना विचारशक्ती द्यावी त्यांना गोष्ट सांगावी पण गोष्टीचे तात्पर्य त्यांना सांगू नये त्यांना विचार करू द्यावा असे प्रतिपादन ज्येष्ठ बाल साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी सार्वजनिक वाचनालय कल्याणने आयोजित केलेल्या पाच दिवशीय चला गोष्टी ऐकुया” या बाल शिबिराच्या समारोप प्रसंगी केले.              माणूस जोडला कि देश आपोआप जोडला जातो पुस्तकातील गोष्टीने माणूस जोडला जातो. प्रयत्नात नंदनवन फुलविण्याची ताकद असते. कोणतेही काम मनापासून केले तर ते नक्की यशस्वी होते. असे मार्गदर्शन प्रमुख पाहुणे एकनाथ आव्हाड यांनी बाल शिबिरातील मुलांना व पालकांना केले.


 

चला गोष्टी ऐकुया या बाल वाचन शिबिरातील धीरज वायगुलभार्गव घोडकेसायली जोशीसायली पाटीलस्वरांगी जानवेअन्वी नाडगौंडापार्थ कोरडे या मुलांनी गोष्ट व गीतांचे सादरीकरण केले. शिबिराविषयी पालकांनी कृतज्ञतापूर्वक आपले मनोगत व्यक्त केले.            यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष मिलिंद कुलकर्णीवाचनालयाचे सरचिटणीस भिकू बारस्करचिटणीस आशा जोशीकार्यकारिणी सदस्य श्रीधर घारपुरेदिलीप कर्डेकरसीमा गोखले तसेच वाचनालयाच्या ग्रंथसेविका उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments