शहरात साथरोग उद्भवू नये यासाठी विविध ठिकाणी धूर व औषध फवारणी मार्च महिन्यात डेंग्युची संशयित रुग्णसंख्या शून्यावर


ठाणे : शहरामध्ये साथीचे आजार उद्भवू नयेत यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीतंर्गत धूर, औषध फवारणी करण्याचे आदेश दिल्यानंतर विविध ठिकाणी व्यापक प्रमाणात धूर व औषध फवारणी सुरु आहे. दरम्यान पाण्यामुळे साथीचे आजार पसरू नये यासाठी प्रत्यक्ष घरी जावून पाण्याची तपासणी करण्यात येत असून माहे मार्च, २०२२ मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या शून्य आढळली आहे.


          ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये माहे मार्च, २०२२ मध्ये डेंग्युचे संशयित रुग्णसंख्या ०० आणि निश्चित निदान केलेले ०० रुग्णसंख्या आहे. तसेच मलेरियाचे माहे मार्च, २०२२ मध्ये २७ तर चिकनगुनियाचे संशयित २० रुग्ण आढळुन आले होते. आरोग्य विभागाच्यावतीने शहरात गृहभेटी देवून तपासणी करण्यात येत असून एकुण ४२,०२७ घरांची तपासणी करण्यात आली.


          त्यापैकी ८५७ घरे दुषित आढळुन आली. तसेच एकुण ५६,४७७  कंटेनरची तपासणी केली असता त्यापैकी ९०७  कंटेनर दूषित आढळुन आले. यापैकी २४७ दुषित कंटेनरमध्ये अळीनाशक टाकण्यात आले. तर ०८ दूषित कंटेनर रिकामे करून काही कंटेनरमध्ये गप्पी मासे सोडण्यात आले.


       दरम्यान महापालिका कार्यक्षेत्रात ९० हॅण्डपंप, १० ट्रॅक्टर्स, ६ ई-रिक्षा, १०  बोलेरो वाहनामार्फत दोन सत्रात २६३७ ठिकाणी औषध फवारणी आणि ४० धूर फवारणी हॅण्डमशीनव्दारे १९,७५५ ठिकाणी धूर फवारणी करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments