मासिक पाळी येणा-या महिलांसाठी आजही विविध बंधने: अवनी सर्वेक्षण

■‘लोणच्याला हात लावू नका’, ‘पवित्र ठिकाणी जाऊ नका’ यांसारखे नियम लागतात पाळावे ~


मुंबई, २९ मार्च २०२२: मासिक पाळीतील स्वच्छतेबद्दल चर्चा करणे समाजात अजूनही निषिद्ध असून मासिक पाळी येणाऱ्या महिलांना आजही विविध बंधनांचा सामना करावा लागत असल्याचे मासिक पाळीच्या सर्वांगीण देखभालीशी संबंधित स्टार्टअप 'अवनी'ने केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. १००० हून अधिक महिलांचा समावेश असलेल्या या सर्वेक्षणाचा उद्देश भारतातील महिला आणि मासिक पाळीच्या स्वच्छता पद्धतींशी संबंधित वास्तविक जीवनातील तथ्ये शोधून काढण्याचा होता.


मासिक पाळीत महिलांनी कोणते नियम पाळावे या संदर्भात महिलांना भेडसावणारे अनेक गैरसमज या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले. यात मासिक पाळीच्या महिलांनी पवित्र कार्य टाळले पाहिजेत किंवा पवित्र ठिकाणी जाणे देखील टाळले पाहिजे, लोणच्याला हात लावू नये, कसरत करू नये, स्वयंपाकघरात जाऊ नये किंवा अन्नपदार्थ किंवा भांडी यांना स्पर्श करू नये, केस धुवू नये, मासिक पाळीत सेक्स करू नये, तुळशीच्या रोपाला स्पर्श करू नये अन्यथा ती मरेल, मासिक पाळीत स्त्री अपवित्र होते, दुग्धजन्य पदार्थ टाळावेत इ. गैरसमज निदर्शनास आले.


अवनीच्या सहसंस्थापिका श्रीमती सुजाता पवार म्हणाल्या की, “सर्वेक्षणाद्वारे मासिक पाळीशी संबंधित समाजाच्या अनेक विद्यमान चिंता प्रकाशात आल्या आहेत. आपण २०२२ मध्ये आहोत आणि अजूनही महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात काळजी घेण्याऐवजी वेगळे ठेवण्याचा सल्ला दिला जातो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, बहुतेक स्त्रियांना त्यांच्या पहिल्या मासिक पाळीचा अनुभव आला तेव्हा त्यांना त्यांच्या शरीरात काय चालले आहे याबद्दल काहीही माहिती नसताना त्यांना सुकविण्यासाठी बाहेर ठेवले होते. ते अजून कोवळ्या वयात होते हे वेगळे सांगायला नको. योग्य ज्ञानाने त्यांना मानसिक आणि शारीरिक तयारी करण्यास मदत झाली असती. ही परिस्थिती लक्षात घेता माहितीचा व्यापक प्रसार आणि वेगवान सामाजिक उत्क्रांतीची नितांत आवश्यकता आहे." 


सर्वेक्षणात सामील ३३% पेक्षा जास्त प्रतिसादकर्त्यांनी सांगितले की त्यांना पहिली मासिक पाळी येण्यापूर्वी मासिक पाळीबद्दल काहीही माहिती नव्हती. एकूण ३५% महिलांना या जीवनाच्या तथ्याबद्दल फारशी कल्पना नव्हती. हा विषय गंभीर आहे कारण ४७.५% पेक्षा जास्त स्त्रियांना त्यांच्या पहिल्या मासिक पाळीच्या वेळी पोटात तीव्र वेदना जाणवतात. पहिल्यांदाच मासिक पाळीला सामोरे जाणे आणि याबद्दल कोणतीही माहिती नसणे हे दर्शविते की समाजात या विषयी किती मोठ्या प्रमाणात जगरूकतेचा अभाव आहे.


तब्बल ८८% महिलांनी सांगितले की त्यांच्या पहिल्या मासिक पाळीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांची आई ही पहिली व्यक्ती होती. तर ८.२% महिलांनी प्रथम त्यांच्या मैत्रिणीची मदत घेतली. या सर्वेक्षणामध्ये  समाजातील लपलेल्या कुप्रथेचा उलगडा झाला जसे की २८% महिलांनी सांगितले की त्यांना त्यांच्या मासिक पाळीच्या काळात वेगळे ठेवण्यात आले होते.


मासिक पाळीच्या दरम्यान महिलांना पेटके येण्यापलीकडे इतर शारीरिक आव्हानांवर प्रकाश टाकताना सुमारे ५०% महिलांनी सांगितले की त्यांना नियमित रसायन आधारित सॅनिटरी पॅड वापरून पुरळ आणि खाज यांसह त्वचेच्या रोगांचा देखील सामना करावा लागतो. सुमारे ४९.९% महिलांनी ३ पेक्षा जास्त सॅनिटरी पॅड ब्रँड वापरून पाहिले आणि नंतर त्यांनी एकाची निवड केली.


नवीन युगातील ऑर्गनीक आरोग्यसेवा उत्पादनांच्या धडाक्यानंतर सर्वेक्षणाने खरी परिस्थिती प्रकाशात आणली ज्यामध्ये महिलांनी पर्यावरणास अनुकूल मासिक पाळीच्या उत्पादनांचा उपयोग करून पाहिला. ५८.९% पेक्षा जास्त महिलांनी कॉटन पॅड वापरून पाहिले, १९.२% पेक्षा जास्त महिलांनी मेंस्टूअल कप वापरले, १६.३% महिलांनी असे सांगितले की त्यांनी प्रतिजैविक पुन्हा वापरता येण्याजोग्या कापडावर आधारित पॅड वापरून पाहिले. तर ४५.८% प्रतिसादकर्त्यांनी कायमस्वरूपी पर्यावरणास अनुकूल मासिक पाळीच्या उत्पादनांमध्ये रुचि दर्शवली.

Post a Comment

0 Comments