नवहिंदू ओवेसींना महाराष्ट्रात लढविण्याचे काम .. राज ठाकरेंवर खासदार राऊत यांनी अप्रत्यक्षपणे टीका...

■भाजपचे सुडाचे राजकारण देशाला , महाराष्ट्राला परवडणारे नाही..


डोंबिवली ( शंकर जाधव )  ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने एका ओवसीला उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरण्यात आले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही नव हिंदू ओवेसीला शिवसेनेविरोधात लढवून हिंदूंचे नुकसान करण्याचे काम भाजप करीत असल्याची जहरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे  नाव न घेता केली. डोंबिवलीत भाऊ चौधरी फाऊंडेशनतर्फे आयोजित मिसळ महोत्सवात ते प्रसिध्दी माध्यमांशी बोलत होते. 


यावेळी शिवसेना नाशिक संपर्क प्रमुख भाऊसाहेब चौधरी, अभिषेक चौधरी,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,उपजिल्हाप्रमुख राजेश कदम,डोंबिवली शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे, युवा सेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, प्रकाश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र दिनानिमित्त  1 मे रोजी औरंगाबाद येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा होत आहे.


 त्यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले की स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यानंतर लोकांना बाळासाहेब ठाकरे हेच हिंदू हृदयसम्राट म्हणून लोकांना माहिती आहेत. कोणी कितीही शाली पांघरल्या, नकला केल्या तरी शेवटी हिंदू हृदयसम्राट हे एकच असल्याचे खासदार संजय राऊत यांनी यावेळी स्पष्ट केले. 


तर सध्या महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या राजकारणावर बोलताना ते म्हणाले की ज्याप्रकारचे राजकारण सध्या सुरू आहे ती मात्र आपली संस्कृती नाही. महाराष्ट्रात यापूर्वीही सत्ताधारी आणि विरोधक, विविध विचारांचे लोकं एकमेकांच्या भूमिकांना विरोध करत राहिले. बाळासाहेब ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर किंवा पवारांनी बाळासाहेबांवर वेळोवेळी टिका केली. परंतु महाराष्ट्राच्या स्थापनेपासून सुड, द्वेष आणि कमरेखाली वार करण्याचे राजकारण कधीच झाले नाही.


भाजपने गेल्या 2 - 4 वर्षांत सुरू केलेले राजकरण महाराष्ट्र आणि देशाला परवडणारे नसल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. तर मिसळ ही महाराष्ट्राची खाद्य संस्कृती असून त्यात झटका आहे. उद्या महाराष्ट्र दिन असून स्वाभिमानाचा झटका अनेकांना द्यावा लागणार असल्याचा अप्रत्यक्ष इशाराही खासदार संजय राऊत यांनी यावेळी दिला.
चौकट


भाषण करायला नाही मिळ खायला आलो आहे.तब्बल दोन वर्षांनी आपण एकत्र आलो आहे. महाराष्ट्रात  विशेषतः मराठी माणसाने मिसळची चव घेतली नाही असे होणार नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिसळ असती तर त्यांनी युद्धात मावळ्यांना मिसलच दिली असती.
----------

कल्याण येथील आर्टिक्त मधुरा कामत हिने बनवलेल्या खासदार संजय राऊत यांनी डिझिटल आर्ट भेट म्हणून दिली.ते पाहून राऊत यांनी मधुराचे कौतुक केले.मिसळ महोत्सवात हे डिझिटल आर्ट पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

0 Comments