'हिंदोळा भावनांचा ' सात्विक, सकारात्मक काव्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

ठाणे, प्रतिनिधी  : "वक्ता जे आपल्या भाषणात सांगतो ते कवी काव्या द्वारे अल्प शब्दात व्यक्त करू शकतो. काव्यामुळे हे जग सुंदर भासत असते." असे उद्गार काढून  आमदार संजय केळकर यांनी  'हिंदोळा भावनांचा 'या  पुस्तकाचे प्रकाशन गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर केले. हा कार्यक्रम हिरानंदानी इस्टेट येथील बँक्वेट हॉलमध्ये झाला .पाच कवयित्रींनी मिळून एकत्रितपणे सादर केलेले हे पुस्तक संवेदना प्रकाशन चे नितीन हिरवे यांनी प्रकाशित केले आमिस्टर हा त्यांचा काव्य संग्रह ज्येष्ठ साहित्यिक वामन पात्रीकर वामन पात्रीकर यांना त्यांनी  समर्पित केला आहे.सुप्रसिद्ध लेखिका आणि अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी सुप्रसिद्ध चित्रकार आणि कवी विजयराज बोधनकर नगरसेवक मनोहर डुंबरे, ब्रम्हांड कट्याचे संस्थापक राजेश जाधव, कवयित्री अनुराधा नेरूरकर आणि पुस्तकाचे प्रकाशक  नितीन हिरवे हे याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.


पुस्तकात सहभागी असणाऱ्या कवयित्री वैशाली लव्हेकर आणि मनीषा पैठणे-दाबके यांनी पुस्तकाची संकल्पना स्पष्ट केली. लॉकडाऊन मध्ये सुचलेल्या या कविता आपले घर ,कुटुंब ,सण-उत्सव नातेसंबंध यांच्याशी निगडित होत्या. पुस्तकाची प्रस्तावना लिहिणार्‍या ज्येष्ठ कवयित्री अनुराधा नेरूरकर यांनी या कविता अतिशय सुसंस्कृत विचारसरणीच्या असल्याचे म्हटले आहे. तसेच संपदा जोगळेकर-कुळकर्णी यांनी या पुस्तकात सहभागी असलेल्या काही कवयित्री अतिशय वयस्कर असूनही काव्यात सकारात्मकपणे रमल्या आहेत याबद्दल आनंद व्यक्त केला. विजयराज बोधनकर यांनी अतिशय सुंदर रेखाचित्रांनी हे पुस्तक सजविले आहे. विजया- वामन पात्रीकर यांची कन्या विशाखा वामन पात्रीकर हिने पुस्तकाचे मुखपृष्ठ रेखाटले आहे.


ज्येष्ठ कवयित्री विजया वामन पात्रीकर, यांनी सर्वांचे  ऋण व्यक्त केले. पुस्तक 'हिंदोळा भावनांचा' एमेझाॅन, फ्लिपकार्ट, बुकग॔गा वर देखील उपलब्ध आहेत.

Post a Comment

0 Comments