आमचे नव्हे तर तुमचे हिंदुत्व संपले' भाजपा जिल्हाध्यक्षांचा शिवसेनेवर निशाणा

डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंदुत्वाच्या मुद्द्यावर स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब आणि भाजपा नेते प्रमोद महाजन यांनी एकत्र येऊन युती स्थापन केली. या दोन्ही पक्षांचे राज्यात नेतृत्व इतके मजबूत होते की या युती सरकार अनेक वर्षे जनतेची सेवा केली. 


           राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीत युतीने आपली ताकद दाखवली.मात्र २०१९ साली शिवसेना-भाजपात मुख्यमंत्री पदावरून फाटाफूट झाली.आता हे दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप करताना दिसतात.डोंबिवलीत एका कार्यक्रमात भाजपा जिल्हाध्यक्षांनी  शिवसेनेवर निशाणा साधत आमचे नव्हे तर तुमचे हिंदुत्व संपल्याचे सांगितले.


       डोंबिवलीत भाजपाचे माजी नगरसेवक विश्वदिप  पवार यांच्या वाढदिवसांनिमित्त  सीकेपी सभागृहात पद वाटप करताना ते बोलत होते. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे,डोंबिवली पूर्व मंडल अध्यक्ष नंदू जोशी, महिला मोर्चा अध्यक्षा पुनम पाटील आदी मान्यवर  उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक हेमलता संत यांनी केले तर विश्वदिप पवार यांनी प्रमुख  पाहुण्यांना शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.यावेळी सर्व मान्यवरांनी विश्वदीप सुभाष पवार यांना वाढदिवसाच्या  शुभेच्छा दिल्या.


        पुढे जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, आम्ही हिंदुत्व सोडलं असं म्हणता पण तुमचे हिंदुत्व संपलेले आहे .भारतीय जनता पार्टीला तुम्ही हिंदुत्व शिकवू नका. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा फोटो  वापरून तुम्ही निवडणूक आलात. आमच्या मताची किंमत तुम्ही कॉंग्रेस-राष्ट्रवादी कडून वसूल केली.या पद वाटपाच्या कार्यक्रमात वॉर्डातील कार्यकर्त्यांना एकूण ६१ पद देण्यात आली. 


       कार्यकर्ते वंदना गोडबोले यांना सन्माननीय सदस्य हे विशेष पद् देण्यात आले.  अशी अनेक पद वाटप करण्यात आली. कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी प्रोत्साहित केले कार्यक्रम पद वाटपाचा कार्यक्रम संपल्यावर उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते आणि  मित्रमंडळींनी पवार यांना वाढदिवसा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments