काँग्रेसला रामराम करून संजय पाटील यांचा राष्ट्रवादित प्रवेश

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) काँग्रेस पक्षात मानवाधिकार विभागात डोंबिवली पश्चिमेकडील पद मिळाल्यावर चर्चेत आलेले आणि काम करून काँग्रेस पक्षाला बळकटी मिळवून देणाऱ्या  संजय पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, कल्याण जिल्हाध्यक्ष जगन्नाथ ( आप्पा ) शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांनी प्रवेश केला.


काँग्रेस पक्ष सोडण्यामागील कारण सांगताना पाटील पक्ष पुढे नेण्यास प्रयत्न केला. मात्र पक्षाकडून मला कौतुकाची थाप मिळत नसल्याचे पाटील यांनी सांगितले. तर पक्षातील चांगला कार्यकर्त्या दुसऱ्या पक्षात का गेला याबाबत वरिष्ठांनी बैठक घेऊन चर्चा केली पाहिजे अशी काही काँग्रेस कार्यकर्ते म्हणत आहेत.

Post a Comment

0 Comments