ओरि‍फ्लेमचे माइण्ड अॅण्ड मूड एसे‍न्शियल ऑईल कलेक्शन


मुंबई, ३ एप्रिल २०२२ : ओरिफ्लेम हा आघाडीचा सोशल सेलिंग स्वीडिश ब्युटी ब्रॅण्ड ब्युटी बाय स्वीडनसह सौंदर्याच्या स्वरूपामध्ये परिवर्तन घडवत आला आहे. ओरिफ्लेमने उत्तम मानसिक आरोग्याचा अनुभव देण्यासाठी माइण्ड अॅण्ड मूड एसे‍न्शियल ऑईल कलेक्शन लॉन्च केले.


ओरिफ्लेमच्या माइण्ड अॅण्ड मूड एसेन्शियल ऑईल ब्लेण्ड्स १०० टक्के नैसर्गिक आहेत आणि तुमचे मानसिक आरोग्य उत्साहित ठेवण्यासाठी काळजीपूर्वक स्रोत निर्माण करण्यात आले आहेत. हे ब्लेण्ड्स एनर्जाइज मी, एम्पॉवर मी, बॅलन्स मी आणि रिलॅक्स मी या ४ व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्‍ध आहेत. ओरिफ्लेमचे माइण्ड अॅण्ड मूड एसेन्शियल ऑईल ब्लेण्ड्स हे मेंदूवरील सकारात्मक परिणाम तपासण्यासाठी न्यूरासायण्टिफिक चाचणी करण्यात आलेले जगातील पहिले ब्लेण्ड्स आहेत.


मेंदूच्या विविध भागांवरील प्रत्येक सुगंधाचा परिणाम फंक्शनल मॅग्नेटिक रिझॉनन्स इमेजरी (एफएमआरआय) चाचणीच्या माध्यमातून प्रखरपणे तपासण्यात आला आहे. ओरिफ्लेमने आपल्या दैनंदिन मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतील, अशा या ४ प्रमुख मोमेण्ट्सना ओळखले आहे, ज्यामधून आपण आपल्या मूडवर नियंत्रण ठेवू शकण्याची खात्री मिळते, जी आज काळाची गरज बनली आहे.


ओरिफ्लेमचे प्रवक्ता म्हणाले, "आम्हाला तुमच्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम निर्माण करेल अशी एसेन्शियल ऑईल ब्लेण्ड्सची आमची नवीन श्रेणी 'माइण्ड अॅण्ड मूड' लॉंच करण्याचा अभिमान वाटतो. आमचा विश्वास आहे की, आरोग्यदायी जीवनशैलीसाठी शारीरिक आरोग्यासोबत मानसिक आरोग्य देखील उत्तम असणे गरजेचे आहे. म्हणूनच हे लॉंच सौंदर्याप्रती आमच्या दीर्घकालीन सर्वांगीण दृष्टीकोनामधील पुढील पाऊल आहे.


माइण्ड अॅण्ड मूड तुमच्या ऊर्जेला चालना देईल, तुमचे मन आरामदायी करते, तुम्हाला गरजेच्या वेळी सक्षम व संतुलित करेल, विशेषत: आजच्या व्‍यस्‍त, डिजिटल विश्वामध्ये तुम्हाला सतत व्यस्त राहावे लागत असल्यामुळे हे ब्लेण्ड्स खूपच उपयुक्त ठरतील. उल्लेखनीय न्यूरोसायण्टिफिक चाचणी करण्यात आलेले माइण्ड अॅण्ड मूड तुमच्या भावना उत्साहित करेल आणि तुमच्या मर्जीप्रमाणे जीवन जगण्यास सक्षम करेल."

Post a Comment

0 Comments