इमार्टिकस लर्निंगच्या अॅनालिटिक्स प्रोग्रामचे सुयश विद्यार्थ्यांना नामांकित कंपन्यांमध्ये मिळाली नोकरी ~


मुंबई, ११ एप्रिल २०२२ : आपल्या विविध सर्टिफिकेट प्रोग्राम्सच्या यशाला अधिक पुढे घेऊन जात इमार्टिकस लर्निंग या भारतातील अग्रणी व्‍यावसायिक शिक्षण कंपनीने जाहीर केले आहे की, त्यांच्या अॅनालिटिक्स प्रोग्राममधील २४ विद्यार्थ्यांना कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रतिष्ठित कंपन्यांमध्ये रोजगार मिळाला आहे. सर्व २४ विद्यार्थ्यांनी पीजीए/पीजीएए प्रोग्राम कोर्स पूर्ण केला आणि ते पुण्यातील एकाच इमार्टिकस लर्निंग सेंटरमधील आहेत.


पोस्ट ग्रॅज्युएट प्रोग्राम इन डेटा अॅनालिलटिक्स अॅण्ड मशिन लर्निंग या कोर्समध्ये नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना त्यांचे कोर्स पूर्ण झाल्यानंतर त्वरित विविध कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली. त्यांच्यापैकी ९ जणांना सामा टेक्नोलॉजीजमध्ये नोकरी मिळाली, ६ जणांना डेटा एण्ट्रेगामध्ये नोकरी मिळाली आणि ४ जणांना कॅपजेमिनीमध्ये नोकरी मिळाली. उर्वरित विद्यार्थ्यांना टायगर अॅनालिटिक्स, बंगी टेक, इग्निटेरियम, हेक्झावेअर आणि ओरिएण्ट टेक्नोलॉजीज यांसारख्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली.


इमार्टिकस लर्निंगचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक श्री. निखिल बर्शीकर म्हणाले, "आम्हाला एकाच बॅचमधील २४ विद्यार्थ्यांना आमचा अॅनालिटिक्स प्रोग्राम कोर्स पूर्ण केल्यानंतर अव्वल कंपन्यांमध्ये रोजगार मिळाल्याचे पाहून खूप आनंद होत आहे. खरेतर हा आमचा सर्वात लोकप्रि‍य प्रोग्राम आहे. आमचे सर्व कोर्सेस विद्यार्थ्यांना त्यांच्यामध्ये मागणीदायी कौशल्ये विकसित होण्यास आणि भविष्यासाठी सक्षम व्यावसायिक बनवण्यास मदत करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. 


आमच्या बहुतांश विद्यार्थ्यांना डेटा सायन्स व अॅनालिटिक्स पदांसाठी प्रख्यात कंपन्यांमध्ये नोकरी मिळाली आहे. आम्ही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा सर्वांगीण विकास करण्यासोबत त्यांना त्यांच्या करिअर्ससाठी प्रबळ पाया रचण्यामध्ये मदत करण्याचे कार्य सुरूच ठेवू."

 

इमार्टिकस लर्निंग ऑनलाइन व ऑफलाइन मोड्समध्ये १६ कोर्सचे शिक्षण देते. हे व्यासपीठ आयआयटी, रूर्की सारख्या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्‍थांसोबत सहयोगाने व्यावसायिक प्रमाणपत्र प्रोग्राम्स देखील देते. इमार्टिकस लर्निंग सध्या भारत व यूएसईमध्ये कार्यरत असून भारतामध्ये १४ केंद्रे आणि यूएईमध्ये एक केंद्र आहे. इमार्टिकस लर्निंगने नुकतेच त्यांची प्रमुख लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम 'पीगासस' लाँच केली आहे. व्यासपीठाच्या उच्च कुशल तंत्रज्ञान टीमने इन-हाऊस डिझाइन केलेली सिस्टिम 'पीगासस' इमार्टिकसच्या विद्यार्थ्यांसाठी एण्ड-टू-एण्ड अध्ययन सोबती आहे.


Post a Comment

0 Comments