कल्याण : कोनावाडी येथे स्मॅश रॅकेट खेळांच्या मैदानाचे उदघाटन झाले असून यामुळे ग्रामीण भागांतील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्तरांवर खेळण्याची संधी मिळणार आहे. स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने भारतभर या खेळांच्या प्रचारासाठी राजस्थानचे मोहम्मद इकराम सचिव स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया हे अथक परिश्रम घेत आहेत. ग्रामीण भागांतील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यासाठी महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या वतीने प्रयत्न केले जाणार आहेत.
यापुर्वी महाराष्ट्रातील खेळाडु जयपूर येथे आयोजित पंच प्रशिक्षण शिबीर आणि राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाले आहेत. नुकतेच स्मॅश रॅकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र स्मॅश रॅकेट असोसिएशनच्या परवानगीने युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि टीम परिवर्तन संस्थेच्या एकत्रित प्रयत्नांतून कोनावाडी, टिटवाळा येथे स्मॅश रॅकेट खेळांच्या मैदानाचे उदघाटन होऊन सरावास सुरुवात करण्यात आली आहे.
मैदानाचे उदघाटन दत्ता बोंबे यांच्याहस्ते झाले यावेळीं युवा संस्कार बहुउद्देशीय संस्था आणि टीम परिवर्तन संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते. शीतल कोठारे आणि मीनाक्षी घोरपडे यांनी खेळांचे साहित्य घेण्यासाठी आर्थिक मदत केली. अत्यंत दुर्गम भागांतील युवकांना स्मॅश रॅकेट खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी सोमनाथ राऊत यांनी पुढाकार घेतला आहे. टीम परिवर्तनचे तुषार वारंग, नामदेव येडगे, भुषण राजेशिर्के, मंगेश तिवारी, विशाल सोडे, शोभा वारंग यांनी मैदान तयार करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
ग्रामीण भागातील खेळाडूंना या खेळांचे मार्गदर्शन मिळावे यांसाठी संघटनेचे अध्यक्ष किशोर कोंढाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्हीं जास्तीतजास्त ठिकाणी मैदान सुरू करण्याच्या प्रयत्नात आहोत असे अविनाश पाटील यांनी यावेळीं सांगितले. त्याचबरोबर कोणत्याही पायाभूत सुविधा नसलेल्या ठिकाणी खेळांचे प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या युवकांचे उदघाटक दत्ता बोंबे यांनी कौतुक केले आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी या उपक्रमाला सढळ हाताने मदत करावी असे आवाहनही केले.
0 Comments