ठाणे महानगर पालिकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी

 


ठाणे : पारंपारिक ढोल ताशे व बॅन्डच्या गजरात आज ठाणे महानगरपालिकेच्यावतीने भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. आज सकाळी राज्याचे नगरविकास मंत्री, तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या समवेत प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, माजी महापौर नरेश म्हस्के यांनी महामानवास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.


      यावेळी माजी उप महापौर सौ.पल्लवी कदम, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, माजी नगरसेवक पवन कदम अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, उप आयुक्त शंकर पाटोळे आदी मान्यवर उपस्थित होते.


       दरम्यान कोर्ट नाका येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला. मर्दानी खेळ, ढोल ताशे, बॅण्ड पथक व  लेझीमच्या गजरात सदर मिरवणूक ठाणे स्टेशन येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ विसर्जित झाली


        आज सकाळी महापालिका भवन येथील कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहामधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अभिवादन केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त जी.जी. गोदेपुरे, आदी मान्यवरांनी देखील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments