डोंबिवली ( शंकर जाधव ) पायी चालण्यासाठी राखीव असलेल्या फुटपाथवर दुकानदारांनी आणि अनधिकृत फेरीवाल्यांनी ताबा घेतला आहे.डोंबिवली पूर्व आणि पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील फुटपाथवर अनेक वर्षांपासून ही पारिस्थती पालिका प्रशासन बदलू शकली नाही.अखेर mh05 सार्वजनिक वाहतूक संस्थेने 'चला फुटपाथवरून चालू' अशी हाक डोंबिवलीकरांना देताच रविवारी दुपारी काही वेळ फुटपाथ फेरीवाला आणि पुतळा मुक्त झाले.पालिकेच्या अनधिकृत फेरीवाला हटाव पथकाने फुटपाथवरील पुतळे हटवले.
डोंबिवली पूर्व-पश्चिमेकडील स्टेशनबाहेरील फुटपाथवर दुकानदार पुतळे ठेवून तर अनधिकृत फेरीवाले कब्जा करून बसले आहेत. स्टेशनबाहेरील अनधिकृत फेरीवाल्यांवर दिखाव्याची कारवाई केली.कारवाई करण्याअगोदर फेरीवाल्यांना कारवाईची माहिती कशी मिळते? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
रविवारी mh0 सार्वजनिक वाहतूक संस्थेने 'चला फुटपाथवरून चालू या' असे आवाहन डोंबिवलीकरांना दिले असता दुपारच्या दरम्यान पालकेच्या कर्मचाऱ्यांनी फुटपाथवरील पुतळे व अनधिकृत फेरीवाले हटवले.मात्र संस्थेची मोहिमे कधी संपेल याची वाट पाहत फेरीवाले स्टेशनबाहेरील परिसरात उभे होते.तर कैलास लस्सी जवळ बुटीक दुकानातील समान नेहमी फुटपाथवर ठेवले जाते.
मात्र संस्थेची मोहीम सुरू होणार असल्याची माहिती असूनही त्यांनी मात्र दुकानातील समान फुटपाथवरच ठेवले होते.दरम्यान संस्थेचे मोहिमेमुळे काही वेळ का होईना नागरिकांना फुटपाथवरून चालण्यास मोकळा मार्ग मिळाला. हे यश पालिकेचे नसून डोंबिवलिकरांच्या या मोहिमेमुळे शक्य झाल्याने नागरिक संस्थेचे आभार मानत आहेत.
0 Comments