महाराष्ट्रातील गडकिल्ले उभारणीत वडार समाजाचा सिंहाचा वाटा - मनोहर बदपटटे


डोंबिवली ( शंकर जाधव ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी पहाडीगड आणि भुइकोट किल्ले उभारणीत ज्या मजूरांचे हात लागले त्या मजुरांमध्ये वडार समाजाचा मोठा हात होता.त्यामुळे या गडकिल्ले उभारणीत वडार समाजाचा सिंहाचा वाटा मानला जातो.


असा हा समाज सरकारी अनेक योजनांपासून वंचीत आहे.या वंचीत समाजाला दिशा देण्यासाठी तसेच या समाजाच्या उत्कर्षा करता प्रयत्न केले जाणार असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण विभागाचे अपर सचिव  मनोहरजी बदपटटे यांनी डोंबिवलीत एका कार्यक्रमात बोलताना केले.


'मी वडार महाराष्ट्राचा'कल्याण जिल्हा जनसंपर्क कार्यालयाचे डोंबिवली पूर्वेकडील रामनगर भागात  गुढीपाडवाचा निमित्ताने उदघाटन करण्यात आले.यावेळी
बदपटटे यांच्या हस्ते कार्यालयाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष मारूती कुशाळकर,  लक्ष्मण पेठेकर ,लक्ष्मण जडाकर, सुभाष विटकर , प्रभु पवार, 
लछयु पवार, सुरेश कुसाळकर , वसंत पेठेकर,  लक्ष्मी पवार , सुषमा पवार ,कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आरोग्य विभाग अधिकारी वसंत देगलुरकर यांसह अनेकजण व  महिला मंडळ उपस्थित होते. 


यावेळी बदपटटे यांच्या हस्ते महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले.ते पुढे म्हणाले, वडार समाज हा कल्याण- डोंबिवलीत विखुरलेला असून या समाजाची संख्या १० हजाराच्या वर आहे.मात्र या समाजाचा उदरनिर्वाह आणि त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न सुटला नाही.या समाजाला एकत्र आणून सरकारी योजनेतून त्याचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न करणार आहे.

Post a Comment

0 Comments