किरीट सोमय्याला अटक करा - शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतर्फे आंदोलन


डोंबिवली ( शंकर जाधव ) किरीट सोमय्या याने लोकांना फसविण्याचा व देशद्रोह केल्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून शिवसेना डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेतर्फे डोंबिवली रामनगर पोलिसांकडे करण्यात आली.


शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, कल्याण उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, तात्या माने, सतीश मोडक, संजय पावशे, कविता गावंड, वैशाली दरेकर, अमोल पाटील, धनाजी चौधरी, सागर जेधे, सागर दुबे,सोपान पाटील, विजय देशमुख, स्मिता माने, यांच्यासह  शिवसैनिक आंदोलनात सहभागी झाले होते. 
  

 किरीट सोमय्या देशद्रोही आहे अशा आंदोलकांना शिवसैनिकांनी दिल्या. बुधवारी शिवसेना खासदार व नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र द्वेष्ट्या किरीट सोमय्या यांनी सन २०१३ ला विक्रांत युद्धनौका वाचवा असे भावनिक आव्हान करून लोकांकडून पैसा गोळा केला होता.


 "सेव आयएनएस विक्रांत" या अभियानातून देशद्रोही किरीट सोमय्या यांनी लोकांच्या देश प्रेमाच्या भावनेशी खेळून ५७ कोटी जमा केले परंतु हा पैसा त्यांनी सरकारकडे जमा केला नाही हे माहितीच्या अधिकाराखाली मिळालेल्या उत्तरादाखल सिद्ध होत असल्याचे सांगून जमा केलेला पैसा भाजपा पक्षाच्या प्रचारासाठी व स्वतःच्या मुलाच्या व्यवसायासाठी वापरला असे आरोप राऊत यांनी केले असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले. 


किरीट सोमय्या देशद्रोही असून त्याला अटक करा अशी मागणीचे निवेदन आंदोलनानंतर पोलिसांना दिले.

Post a Comment

0 Comments