कल्याण : कल्याण तालुक्यातील म्हारळ गाव येथे अनेक वर्षापासून डॉ. प्रविण आणि श्वेता पाटील आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना काळातही आपला जीव धोक्यात घालून म्हारळ गाव व परिसरात देवदूतासारखे काम करत होते.
म्हणून ग्रामपंचायत महिला सदस्यांनी आयोजित केलेल्या महिला मेळावा कार्यक्रमात म्हारळ गावच्या उपसरपंच अश्विनी देशमुख, सदस्य वेदिका गंभीरराव, किशोर वाडेकर व निलेश देशमुख, विवेक गंभीरराव, मनीषा वाडेकर इतर मान्यवरांनी डॉक्टर प्रवीण पाटील व श्वेता पाटील या दाम्पत्याचा आरोग्यदूत पुरस्कार देऊन सन्मान केला. म्हारळ गाव व परिसरात डॉक्टर दाम्पत्यांचं कौतुक केले जात आहे.
0 Comments