अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी स्पर्धेला सुरवात

■मुंबई विद्यापीठ आणि बी .के. बिर्ला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

कल्याण : मुंबई विद्यापीठ आणि बी .के. बिर्ला महाविद्यालय,  कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितअखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी स्पर्धेला सुरवात झाली आहे. ही स्पर्धा बी.के.बिर्ला महाविद्यालयकल्याण आणि मुंबई विद्यापीठमुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे. ही अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ रग्बी स्पर्धा दिनांक १२  एप्रिल ते २१ एप्रिल २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत भारतातील विविध राज्यातीलविविध विद्यापीठातील एक हजाराहून अधिक पुरुष  व महिला खेळाडू सहभागी झालेले आहेत. शहाड येथील रामलीला मैदानावर’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


या स्पर्धेचे उद्घाटन केडीएमसी आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी, मुंबई विद्यापीठाचे प्रा. उपकुलगुरुप्रा. आर. डी. कुलकर्णीबी. के. बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ. नरेश चंद्ररग्बी फुटबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राहुल बोस  यांच्या हस्ते झाले. आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी खेळ हा जीवनाचा मुख्य भाग असल्याचे सांगताना कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला प्रत्येक स्तरावर खेळाचे केंद्र बनविण्याबाबत आपले विचार मांडले. त्यासाठी कल्याण महापालिकेच्या शाळांमध्ये रग्बी सुरू करण्याबाबतही संकेत त्यांनी दिले.


मुंबई विद्यापीठाचे उपकुलगुरू प्रा. आर. डी.कुलकर्णी यांनी खेळ हा मूळ विषय म्हणून शिकवण्याच्या गरजेवर भर दिला. ते म्हणाले की, ‘खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई विद्यापीठातर्फे विशेष क्रीडा केंद्र सुरू करण्यात आले आहे.’ बिर्ला महाविद्यालयाचे शिक्षण संचालक डॉ.नरेश चंद्र यांनी सर्व विद्यार्थ्यांना खेळात सहभागी होताना समर्पित भावनेने खेळण्याचा सल्ला दिला. रग्बी फुटबॉल असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री राहुल बोस यांनी आयोजकांचे कौतुक करताना सांगितले की, ‘आज क्रिकेटच्या पलीकडे खेळाला प्रोत्साहन देण्याची वेळ आली आहे.


 याप्रसंगी व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुबोध दवेमुंबई विद्यापीठाचे क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक  डॉ. मोहन अमरुळे व राष्ट्रीय रग्बी संघाचे सदस्य व भारतातल अनेक विद्यापीठांचे क्रीडा संचालक व प्राध्यापक उपस्थित होते. 

Post a Comment

0 Comments