कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठात स्वामी समर्थ प्रकटदिन संपन्न


कल्याण : कल्याण पश्चिमेतील बिर्ला काँलेज रस्त्यानजीक  फाँरेस्ट काँलनीतील पुरातन वडाच्या छायेतनैसर्गिक वातावरणांची देखभाल जतन करीत उभारलेल्या स्वामी समर्थ मठात सालाबादप्रमाणे यंदाही भक्तीपूर्ण वातावरणात  स्वामी समर्थ प्रकट दिन संपन्न झाला.


कल्याण पश्चिमेतील स्वामी समर्थ मठाची स्थापना गुरूवर्य मोडक महाराजांनी केली आहे. या मठात प्रमुख चार उत्सव होतात. दर गुरुवारी स्वामींची पालखी निघते. यंदा कोरोना निर्बंध उठविल्याने  गुडी पाडव्याला अध्यात्मिक रुपी संतसंगाची गुडी गुरूवर्य मोडक महाराजांनी उभारून संतोषी माता मंदिरात नवदुर्गा रुपी नवघट बसवून मौन वत्र  सुरु केले असुन रामनवमीला या व्रताची सागंता होणार आहे. पव्रित  नऊ घटातील जलाचे तीर्थ शिंपडण्याचा विधी या दिवशी संपन्न होणार आहे. 


रविवारी संपन्न झालेल्या स्वामी समर्थ  प्रकटन दिनानिमित्त पहाटे पासून  अभिषेकपुजनआरती भजन अशा धार्मिक क्रार्यक्रम संपन्न झाले. स्वामीची पालखी सोहळा हा स्वामी समर्थ मठ ते  किल्ले दुर्गाडी दुर्गाडीदेवी मंदीर येथे आरती पुजा भगावामम्य वातावरणात संपन्न झाला. पालखी मठात आल्यानंतर आरती संपन्न झाली. या उत्सव सोहळ्या निमित्ताने स्वामी भक्तांची मांदियाळी झाली होती. सुमारे २० हजारहुन अधिक स्वामी भक्तांनी महाप्रसाद भंडार्याचा लाभ यानिमित्ताने घेतला.

Post a Comment

0 Comments