गांजा तस्करी करणाऱ्या तिघांना मानपाडा पोलिसांनी केली अटक

कल्याण धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथून गांजा आणून डोंबिवलीत विकणाऱ्या त्रिकुटाचा मानपाडा पोलीसानी पर्दाफाश केला आहे. दरम्यान तीन महिन्यापूर्वी देखील शिरपूर येथील गांजा तस्कर त्रिकूटाला  मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा  शिरपूर मधील दुसरी टोळी मानपाडा पोलिसांच्या हाती लागल्याने धुळे जिल्ह्यातील शिरपूर मानपाडा पोलिसांच्या रडारवर आले आहे. मयूर जडाकर, अखिलेश धुळप, सुनील उर्फ लोका खजन उर्फ पावरा अशी तिघांची नावे आहेत.


      हि कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त जे. डी. मोरे, मानपाडा पोलीस स्टेशनचे व.पो.नि. शेखर बागडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, सहा. पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे, पो.ना. प्रशांत वानखेडे, अशोक कोकोडे, सुशांत तांबे, पोशि. संतोष वायकर, ताराचंद सोनवने यांच्या पथकाने केली.  

 

यामधील मयूर जडाकर याच्या विरोधात गांजा तस्करीप्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात दोन तर  मध्यप्रदेशमध्ये एक गुन्हा दाखल आहे मयूर हा चार महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता. तर सुनील उर्फ लोका खजन उर्फ पावरा याला शिरपूर येथून अटक करण्यात आली आहे. डोंबिवली  शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना हा गांजा विकला जात असावा असा पोलिसांना संशय असून पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.


डोंबिवलीतील मानपाडा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी सुनिल तारमळे यांना डोंबिवलीतील देसले पाडा येथील एका घरात विक्री साठी गांजाचा साठा करून ठेवल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे  सुनील तारमळे यांच्या पथकाने देसले पाडा येथील एका इमारतीच्या घरात छापा टाकला. या छाप्यात त्यांना सुमारे सहा किलो गांजा आढळून आला मानपाडा पोलिसांनी हा गांजा ताब्यात घेत घरात आढळलेला  मोबाईल फोन, रोख रक्कम, गाडी असा एकूण १ लाख ८७ हजरांचा मुद्देमाल जप्त केला.


 या प्रकरणी मयूर जडाकर व अखिलेश धुळप या दोघाना अटक केली. या दोघांकडे चौकशी केली असता सदरचा गांजर त्यांनी शिरपूर येथून विकत आणला असल्याचे माहिती दिली. पोलिसांनी शिरपूर घाटात सुनील लोक भजन पावरा यांना शिरपूर येथून अटक केली. धुळे जिल्ह्यातील शिरपूर लाकड्या हनुमान गाव येथे  एका जंगलात गांजाची शेती केली जाते. 


तेथून हा गांजा चोरट्या मार्गाने शहरात आणून  विक्री केला जात असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. त्यामुळे आता शिरपूर पोलिसांच्या रडारवर आले आहे. हा गांजा शहरातील विद्यार्थी व उच्चशिक्षित लोकांना विकला जात असल्याचा संशय पोलीसानी व्यक्त केला असून त्या दिशेने पोलीसानी तपास सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments