ठाण्यात प्रथमच छत्रपती संभाजी राजांना मानवंदना शेकडो ठाणेकरांनी केले अभिवादन


ठाणे (प्रतिनिधी) - ओबीसी एकीकरण समिती, मराठा महासंघ यांच्या वतीने फाल्गुन अमावस्येला प्रथमच छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनाच्या अनुषंगाने मानवंदना देण्यात आली. यावेळी शेकडो ठाणेकरांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले.

 

फाल्गुन अमावस्येला स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने हत्या केली होती. मात्र, दुसर्याच दिवशी गुढीपाडवा असल्याने संभाजी राजांना अभिवादन करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अभिवादन सभा आयोजित करण्यात येत नसल्यानेच प्रफुल वाघोले, संजय भालेराव, चिंतामणी कारखानीस यांच्या संकल्पनेतून या अभिवादन कार्यक्रमाचे चिंतामणी ज्वेलर्स समोर, मासुंदा तलाव येथे सायंकाळी 6 ते रात्री 10 या वेळेत आयोजन करण्यात आले होते. 


सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास खा. राजन विचारे, रिपाइं नेते जितेंद्रकुमार इंदिसे, मराठा नेते राजन गावंड, मंगेश आवळे यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन मानवंदना कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.


रात्री दहा वाजेपर्यंत विविध स्तरातील नागरिकांनी छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यामध्ये मेघनाथ घरत, समीर गुप्ते, शेखर पाटील, राजाभाऊ चव्हाण, बन्सी डोके, श्रेया तटकरे, प्रतिभा शिर्के, विक्रांत वायचाळ, नितीन लांडगे, हेमंत राऊत, अनिल नलावडे, राहुल पिंगळे, सचिन केदारी, सुभाष देवरे, विजय घाटे, सुरेश पाटीलखेडे, राकेश पुर्णेकर, राजन गावंड, संजय मिरगुडे, जयवंत बैले, चंद्रशेखर देसाई, यतिन पवार, निलेश हातणकर, अमृता पवार या मान्यवरांचाही समावेश होता.

Post a Comment

0 Comments