रिक्षाचालकांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी


कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती २०२२ रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन तर्फे महामानव आंबेडकर जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव गेली २६ वर्षे सुभाषचौक येथे रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन उत्सव समितीच्या वतीने साजरा करण्यात येत असून दिवंगत नेते प्रकाश पेणकर यांनी येथुन रिक्षा संघटने मार्फत जंयती उत्सवास सुरुवात केली.


यंदाही प्रणव पेणकर यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.  जंयती कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे शहर वाहतूक नियंत्रण पोलिस निरीक्षक महेश तरडे यांनी पुष्पहार अर्पण करून पुजन केले. उपस्थित मान्यवरांनी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. याप्रसंगी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला माजी नगरसेवक पुरोषोत्तम चव्हाण यांनी पुष्पहार अर्पण करून वंदन केले.


या जंयती कार्यक्रमात रिक्षा संघटना कार्यकर्ते व रिक्षा चालक दशरथ मनोहर यांचे सुपुत्र वैभव दशरथ मनोहर यांनी सिए परिक्षेत प्राविण्य मिळवून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले म्हणून प्रणव पेणकर यांनी त्यांचा सत्कार केला. सुञसंचालन ज्येष्ठ पदाधिकारी रवि कांबळे यांनी केले. प्रणव पेणकर व उपस्थित पदाधिकाऱ्यांनी चारशे रिक्षा चालकांना अल्पोहार पाकिट वाटप करण्यात आले. याप्रसंगी जितू पवार, संतोष नवले, नुपुर धाडीगावकर, रोहित डुमणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.


या जयंती उत्सव कार्यक्रमासाठी प्रताप सरोदे, रवींद्र कांबळे, दशरथ मनोहर, जगन्नाथ भागडे, अशोक कांबळे, प्रकाश हजारे, चंद्रशेखर नवले, कमलेश गायकवाड प्रदीप घुसळे, अनिल पंडित,राजेंद्र घेगडमल, मिलिंद घाटेराव,बाळा बनसोडे, सुधीर सोनावणे, बळीराम जगताप, संतोष पाठारे, नितीन घोडेस्वार, विजय देसाई, वसंत वाघेला, निलेश भिंगारदिवे, सुनील जगताप, योगेश त्रिभुवणे यांच्यासह इतर पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments