शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेसने केला निषेध...


भिवंडी दि 9 (प्रतिनिधी ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी एस टी कामगारांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा सर्वच थरातून निषेध नोंदविला जात आहे .शुक्रवारी सायंकाळ पासून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करून निदर्शने केली जात असताना शनिवारी राज्यात मूक आंदोलन करण्यात येत आहे .भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण च्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या परिसरात सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली घोषणाबाजी करीत निदर्शने केली.या आंदोलनात अनेक पक्ष कार्यकर्ते सहभागी झाले होते .

Post a Comment

0 Comments