रेल्वे मध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

कल्याण : आसनगावला जाणारी गाडी कल्याण स्थानकात फालाटावर उभी असताना दारात उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने खेचून पळवून नेल्याची घटना ३० मार्च रोजी घडली होती.  दरम्यान या चोरट्यांना रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडील चोरीचा फोन जप्त केला आहे.


       मुंब्रा स्थित २४ वर्षीय रुस्तम सिद्दीकी आणि जाहिद अन्सारी या दोघांना अटक केली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलिसांनी सिसी टीव्ही फुटेजचा आधार घेत या गुन्ह्यात २ जणांचा समावेश असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.  यावेळी गुप्त बातमीदार यांच्या साहाय्याने सीसी टिव्ही मध्ये दिसणारा एक इसम  कल्याण स्थानकातील फलाट क्रमांक १ वर येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांनी सिद्धिकीला अटक केली.


 त्यानंतर सिद्धिकीकडे चौकशी केली असता त्याने त्याच्याबरोबर असलेल्या इसामाचे नाव आणि पत्ता सांगितला. त्यानुसार पुन्हा एकदा बातमीदाराने दुसरा आरोपी अन्सारी हा मुंब्रा येथील रशीद कंपाऊंड येथे असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून  रविवारी दुपारी अन्सारी याला अटक केली. अन्सारी याच्याकडून चोरी झालेला फोन हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. साध्य या दोघांनाही सोमवार पर्यंत पोलीस कोठडी ठोठवण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments