भारतीय संविधानामुळेच मी आमदार होऊ शकलो - आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती २०२२ आणि भारतीय बौद्ध महासभा  यांच्या संयुक्त विद्यमाने महामानव क्रांतिसूर्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त कल्याण पश्चिमेतील सम्राट अशोक नगर नालंदा बुद्ध विहार उंबर्डे रोड कल्याण पश्चिम या ठिकाणी तीन दिवसीय विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


 

१३ एफ्रिल रोजी सायंकाळी आयोजित कार्यक्रम श्रीरंग गोंडगे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला असून यावेळी विचारमांचकावर प्रमुख उपस्थित म्हणून आमदार विश्वनाथ भोईरनगरसेवक जयवंत भोईर, समाजसेवक नंदू शेलारप्रमुख वक्ते आनंदा ओवळ सामाजिक कार्यकर्ते रविंद्र गुरचल आदी उपस्थित होते. भारतीय संविधानातील नागरिकांचे हक्क आणि अधिकार प्रमुख वक्ते म्हणून संविधान विश्लेषक आणि अभ्यासक आनंदा ओवळ यांनी भारतीय संविधानावर मोलाचे मार्गदर्शन करून संविधानातील आपले हक्क आणि अधिकार कसे  प्राप्त करून घेतले पाहिजे हे उपस्थितांना समाजवून सांगितले. पुढील भाषणात आमदार विश्वनाथ भोईर असे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. या महापुरुषांची जयंती एक दिवस साजरा न करता ३६५ दिवस जयंती साजरी केली तरी कमीच आहे कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानामुळेच मी आमदार होऊ शकलो ही या संविधानाची ताकत आहे.डॉ बाबासाहेब आंबेडकर हे वर्गांच्या बाहेर बसून त्यांनी शिक्षण घेतले आणि त्यांच्या बुद्धीच्या बळावर ते महामानव होऊ शकले आज मात्र प्रत्येक शालेय शिक्षणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा धडा शिकवला जातो असे महामानव बोधिसत्व प.पु.यांच्या १३१ व्या जयंती निमित्त मार्गदर्शन करून आमदार विश्वनाथ भोईर यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन राजू काऊतकर यांनी केले तर श्रीरंग गोंडगे,विठ्ठल मोरे,अजय मगरे,सूरज भालेराव,अनिता गोंडगे,बाबासाहेब भालेराव,रोशन गायकवाड,अशोक गवळी सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

Post a Comment

0 Comments