डोंबिवली पूर्वेतील ७ मजली इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची कारवाई

■कल्याण डोंबिवली महापालिकेची अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई सुरुच


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसारविभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली फ प्रभागाचे सहा. आयुक्त राजेश सावंत यांनी डोंबिवली पूर्व खंबाळपाडाभोईरवाडी परिसरातीलडॅडी चौकातील कृष्ण व्हीला येथील बांधकामधारक शोभाराम चेनाजी चौधरी यांच्या सरकारी जागेवर असलेल्या  ७ मजली  इमारतीच्या अनधिकृत बांधकामावर निष्कासनाची धडक कारवाई आज सुरू केली.

 

          हि निष्कासन कारवाई ग प्रभागाचे अधिक्षक अनिळ इंगळे,  फ प्रभागाचे फेरीवाला पथक प्रमुख दिनेश वाघचौरे अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारी महापालिका पोलिस कर्मचारीटिळक नगर पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांच्या मदतीने व १ पोकलेन१ जेसीबी ५ ब्रेकर१ गॅस कटर  यांच्या सहाय्याने करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments