गावठी दारुच्या भट्टीवर कल्याण क्राईम ब्रांचची धडक कारवाई


कल्याण : कल्याण पश्चिमेकडील उंबर्डे गावात लपून छपून दारु तयार केली जात असल्याची माहिती कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी  क्राईम ब्रांचच्या पथकाने  त्याठिकाणी छापा टाकत  कारवाई केली. या ठिकाणी बेकायदेशीर रित्या गावठी दारू तयार करण्याची  मोठ्या आकाराची दारुची भट्टी तयार करण्यात आली होती.


छाप्या दरम्यान २३ बॅरेल गावठी दारु मिळून आली. गावठी दारू तयार करण्याची भट्टी ,दारू गाळण्याची साधने उद्धवस्त केली आहे. दारुचा अड्डा चालविणारा कैलास कारभारी याला अटक करत त्याला खडकापाडा पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

Post a Comment

0 Comments