लक्झरी चॉकलेट ब्रँड स्मूरचे मूल्य आता ५० दशलक्ष डॉलर्स पार रिबेल फूड्सकडून बहुसंख्य समभागांची खरेदी ~


मुंबई, ११ एप्रिल २०२२ : रिबेल फूड्स (Rebel Foods,) या जगातील सर्वांत मोठ्या इंटरनेट रेस्टॉरंट कंपनीने स्मूर (SMOOR) या लक्झरी चॉकलेट ब्रँडमधील गुंतवणूकीची घोषणा केली असून आपले स्थान थ्रेसिओ ऑफ फूड म्हणून स्थापित केले आहे.

 

रिबेल फूड्सच्या आगामी काही वर्षांमध्ये आपल्या क्लाऊड किचन्समधून अधिकाधिक अन्न वर्गवारींना सेवा देण्यासाठी गुंतवणूक करून विश्वासार्ह ब्रँड्स ताब्यात घेण्याच्या आपल्या लक्ष्याचा भाग म्हणून १५० दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणूकीच्या घोषणेनुसार हे पाऊल उचलले गेले आहे. या गुंतवणूकीसोबत स्मूरचे ध्येय २०२२-२३ पर्यंत तीन पटींनी विस्तार करण्याचे आहे. स्मूरला ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सवरही प्रचंड वेग आणि ग्राहकांचे प्रेम प्राप्त झाले आहे आणि ही भागीदारी ब्रँडच्या वाढीत आणखी मदत करेल.


स्मूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी विमल शर्मा म्हणाले की, “भारतीय चॉकलेटची बाजारपेठ अत्यंत वेगाने वाढते आहे आणि आम्हाला या गोष्टीचा अभिमान वाटतो की, स्मूर उद्योगाच्या वेगानुसार जुळवून आपला विस्तार करत आहे. आम्ही भारतात प्रीमियम चॉकलेटची वर्गवारी तयार करून त्यात आघाडी घेत असताना आणि भारतीय डेझर्टप्रेमींना प्रीमियम चॉकलेट्स, केक्स, मॅकरून्स आणि इतर गोष्टी देत असताना आम्हाला पुढील पाऊल टाकताना खूप आनंद होत आहे. रिबेल फूड्सच्या गुंतवणूकीसोबत आम्ही जागतिक बाजारपेठेत आणखी खोल जाण्यासाठी, विविध आणि सहजसाध्य बाजारपेठांमध्ये नवीन आणि आकर्षक कन्फेक्शनरीज आणण्यासाठी सज्ज आहोत. आम्ही या विकासाच्या पार्श्वभूमीवर पुढे जाणाऱ्या वाढीसाठी सज्ज आहोत.”


स्मूर ब्रँड मागील वर्षाच्या तुलनेत १२० टक्क्यांपेक्षा अधिक वाढला आहे आणि २०२६ पर्यंत १०० दशलक्ष डॉलर्सचा वार्षिक महसूल भारतात आणि जागतिक पातळीवर आपला विस्तार वाढवून साध्य करण्याच्या प्रयत्नात आहे. स्मूर आपले एकल वाहन वितरण धोरण आपली प्रत्यक्ष ग्राहक अनुभव केंद्रे भारतातील टायर १ शहरांमध्ये विस्तारित करून आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आपले ऑनलाइन अस्तित्व वाढवून उभारणे कायम ठेवणार आहे. भविष्यातील विस्तारात त्यांचे प्रत्यक्ष अस्तित्व ९ शहरांमध्ये वाढवणे (मुंबई, पुणे, हैदराबाद, चेन्नई, बंगळुरू, नवी दिल्ली, गुरगाव, नोएडा, फरिदाबाद) याचा समावेश असेल आणि विविध माध्यमांवरील त्यांचे अस्तित्वही वाढीस लागेल.

Post a Comment

0 Comments