त्या मातेचे अश्रू अनावर झाले.... गुढीपाडवा दिनी फडके रोडवरून मुलगा बेपत्ता

 


डोंबिवली ( प्रतिनिधी ) २ एप्रिल गुढीपाडवादिनी फडके रोडवर अफाट गर्दीत आपलं लेकरू कुठं हरवलं अस म्हणत ती आई रामनगर पोलीस ठाण्यात गेली. आपला मुलगा  हरवल्याची नोंद पोलीस ठाण्यात करून पाच दिवस उलटले तरी अजून  मुलगाचा थांगपत्ता लागला नसल्याने त्या मातेचे अश्रू अनावर झाले.   
   

डोंबिवलीत भिक मागणाऱ्या प्रियंका जरकर भोसले (30) या महिलेचा ११ वर्षीय मुलगा रामेश्वर हा 
शनिवारी गुढी पाडव्याच्या दिवशी निघालेल्या स्वागत यात्रेत या  अचानक बेपत्ता झाला. मात्र अद्याप हा मुलगा सापडला नाही.प्रियंका ही मुलासह मंदिरासमोर बसून ती भीक मागत असते. शनिवारी डोंबिवलीत श्री गणेश मंदिर संस्थानच्यावतीने सकाळी शोभा यात्रा काढण्यात आली होती.


 त्याचदरम्यान प्रियंकाचा मुलगा गर्दीत बेपत्ता झाला. मुलगा कुठेही आढळून आला नाही. आपल्या मुलाला पळवून नेल्याची तक्रार प्रियंका भोसले हिने पोलिस ठाण्यात दिली. या प्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम 363 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या मुलाचा शोध फौजदार व्ही. बी. कांबळे घेत आहेत.

Post a Comment

0 Comments