पक्षांना पाणी उपलब्ध होण्यासाठी मातीच्या वॉटर पॉट चे वाटप

■योगदान फाउंडेशनच्या वतीने तहानलेल्या पक्ष्यांसाठी अनोखा "पक्षी मित्र"उपक्रम..


कल्याण : पक्षी संवर्धनासाठी सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवत निसर्गसंवर्धनात आपल्या परीने महत्वाची भूमिका पार योगदान फाउंडेशनच्या वतीने एक अनोखा पक्ष्यांसाठी पाण्याच्या पॉट वाटप करत  पक्षी संवर्धन मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 वाढत्या तापमानाचा परिणाम हा मानव बरोबर निसर्गातील प्रत्येक जीव सृष्टी होत आहे. वाढत्या शहरीकरणामुळे पक्ष्यांना पाणी मिळण्यासाठी खूप भटकंती करावी लागते. काही प्रसंगी पाणी उपलब्ध न झाल्यास त्याचा जीव ही जातो. याचाच विचार करत योगदान फाउंडेशनच्या वतीने मातीचे वॉटर पॉट वाटप कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
 
या उपक्रामअंतर्गत पक्ष्यांना सहज पाणी उपलब्ध व्हावे तसेच नागरिकांमध्ये मध्ये पक्षी संवर्धनाची आवड निर्माण व्हावी या करिता  योगदान फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नगिरिकाना नि : शुल्क मातीचे वॉटर पॉट वाटप करण्यात आले.  

या प्रसंगी  योगदान फाउंडेशनचे अध्यक्ष मदन चव्हाण, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार अजय शेलार, बिपिन अडांगलेएस वी ए ग्रुपचे संस्थापक संदीप घुगे उपस्थित होते. तसेच योगदान फाउंडेशनचे सेक्रेटरी रितेश कांबळेसभासद सुनील शिंदे, पक्षी मित्र मनोज पांडेअनंत बेलेकरमनीष वरवटकर, मनाली वरवटकर आदी उपस्थित होते.

मान्यवरानी उपस्थित पक्षी मित्रांना व नागरिकांना मार्गदर्शन केले. भारतातील सर्व नागरिकांनी या उपक्रमात एकत्र यावे असे आवाहन केले. तसेच प्रत्येक नागरिकांनी या उन्हाळ्यात  पक्ष्यांना सहज पाणी मिळण्या करिता आपल्या अंगणात किंवा बाल्कनीत पाण्याचे पॉट ठेवावे असे आवाहन करत  पक्षी संवर्धनाची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकांची आहे असे यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments