ईलर्न मार्केट्स द्वारे मेगा ट्रेडिंग कॉन्क्लेव्हचे आयोजन

■ २५० हून अधिक स्टॉक मार्केट ट्रेडर्सना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट ~


मुंबई, ८ एप्रिल २०२२ : वेब आणि मोबाइल दोन्हीवर उपलब्ध भारतातील प्रमुख ऑनलाइन आर्थिक शिक्षण प्लॅटफॉर्म ईलर्नमार्केट्स (Elearnmarkets)ने फिनटेक प्लॅटफॉर्म डेटा अॅनालिटिक्स अॅप स्टॉकएज सोबत २६ ते २९ एप्रिल २०२२ दरम्यान गोव्यात फेस२फेस मेगा ट्रेडिंग कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीची घोषणा केली आहे. लाइव्ह मार्केट स्ट्रॅटेजी सत्रांद्वारे २५० हून अधिक ट्रेडर्स आणि उत्साही लोकांना या प्रतिष्ठित स्टॉक मार्केट तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.


हा कार्यक्रम प्रकाश गाबा, विवेक बजाज, प्रेमल पारेख, शिवकुमार जयचंद्रन, विजय ठाकरे, चेतन पंचमिया, राकेश बन्सल, कुणाल सरावगी, पियुष चौधरी, असित बरन पती, विशाल बी मलकन आणि संदीप जैन यांसारख्या भारतातील विविध भागांतील १२ प्रसिद्ध व्यापारी आणि बाजारातील सहभागींना एकत्र आणण्यात अतुलनीय भूमिका बजावेल.


स्टॉकएज आणि ईलर्नमार्केट्सचे सह-संस्थापक श्री विवेक बजाज म्हणाले, "फेस२फेस ट्रेडिंग मेगा कॉन्क्लेव्ह हे ५० दशलक्षाहून अधिक व्ह्यूजसह प्रसिद्ध फेस२फेस युट्युब मालिकेचा विस्तार आहे. या कार्यक्रमामुळे सहभागींना थेट बाजारपेठेतील अस्सल मार्केट तज्ज्ञांकडून व्यापार धोरण शिकण्यास मदत होईल. तसेच या ३ दिवसांच्या वाढीव दिवस-रात्र सत्रांमध्ये नेटवर्किंगच्या उत्तम संधी उपलब्ध असतील.”


तज्ञांची निवड करण्यापासून ते स्ट्रॅटेजी सत्रांचे नियोजन करण्यापर्यंत, हा कार्यक्रम जागरूकतेने तयार केला गेला आहे. या कार्यक्रमाच्या मुख्य अंतर्निहित घटकांपैकी एक म्हणजे बाजारातील ट्रेंड आणि ज्ञानाची आवश्यकता लक्षात घेऊन बाजारातील सहभागींना अतुलनीय मूल्य प्रदान करणे आहे.

Post a Comment

0 Comments