कल्याण : गेल्या २ वर्षांपासून कोरोनामूळे खंडीत झालेली गुढीपाडव्याची स्वागतयात्रा कल्याण पश्चिमेतही आयोजित करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून कोवीडचे सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह असतानाच कल्याणकरांसाठी हि आनंदाची बातमी आहे.
ऐन वेळेला मिळालेली परवानगी आणि गुरुवारी शासनाने मागे घेतलेले निर्बंध यामुळे यंदाची स्वागतयात्रा पालखी सोहळा, भजनी मंडळ आणि ढोल ताशा पथक अशा पद्धतीने त्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे कल्याण शहर अध्यक्ष महेश केळकर यांनी दिली.
0 Comments