परीक्षेच्या दिवसात गरिब विद्यार्थ्यांना भाजपची साथ परीक्षा केंद्रातपर्यत रिक्षाने मोफत प्रवास


डोंबिवली ( शंकर जाधव )  माध्यमिक शालांत परीक्षेतील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यत जाण्यासाठी भाजप कल्याण डोंबिवली ओबीसी सेलचे उपाध्यक्ष दिनेश जाधव यांनी मदतीचा हात पुढे केला होता. `हात दाखवा.. रिक्षा थांबवा` अशी मोफत रिक्षा सेवा गरीब विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यत जाण्यासाठी  उपलब्ध करून दिल्याबद्दल विद्यार्थी आणि पालकवर्गानी जाधव यांचे आभार मानले.अशी सेवा देणाऱ्या रिक्षाचालकांना जाधव यांनी मानधन दिले.  


    कडक उन्हात घराबाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यत जाण्यासाठी वाहनातून प्रवास करावा लागत होता. मात्र प्रत्येक विद्यार्थ्यांना रिक्षाचा प्रवास परवडणारा नव्हता. अश्या विद्यार्थ्यांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन  भाजप कल्याण डोंबिवली ओबीसी सेलचे उपाध्यक्ष जाधव यांनी विद्यार्थ्यांना मदत करण्याचे ठरविले.डोंबिवली पश्चिमेकडील रिक्षा संघटनेबरोबर याबाबत चर्चा केली. `हात दाखवा.. रिक्षा थांबवा` अशी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रापर्यत मोफत रिक्षा सेवा सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यत सुरु करण्यात आली होती.


    डोंबिवली पश्चिमेककडील राजूनगर,चर्चजवळ, दोन टाकी, उमेशनगर, उमेशनगर मच्छीमार्केट,शिवमंदिर, जयहिंद कॉलिनी,नवापाडा,सुभाष रोड, विशाल बिल्डींग जवळ येथे ही मोफत सेवा उपलब्ध होती. काल दहावीचा शेवटा पेपर संपल्यावर विद्यार्थी आणि पालकवर्गानी दिनेश जाधव आणि रिक्षाचालकांचे आभार मानले.जाधव यांनी रिक्षाचालकांना आपल्या कार्यालयात १५ दिवसाचे मानधन दिले.त्यावेळी रिक्षाचालकांनी जाधव यांच्या या उपक्रमाबाबत कौतुक केले.

Post a Comment

0 Comments