हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा


कल्याण :  हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापन दिन  सोहळा नुकताच  मोठ्या उत्साहात पार पडला . यावेळी  लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा ,मोफत मेडिकल कॅम्प ,लकी ड्रॉ,सफाई कामगारांचा सन्मान आणि गोरगरीब गरजू महिलांना धान्यांचे  किट वाटप करुन सामाजिक बाधिलकी  जपत हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेचा चौथा  वर्धापन दिन  सोहळा मोठ्या उत्साहात हेलपिंग हँड मदत कक्ष चिकणघर कल्याण येथे साजरा करण्यात आला. 


यावेळी माजी आमदार  नरेंद्र पवार , माजी आमदार प्रकाश भोईर, कल्याण डोंबिवली   महानगरपालिकेचे उपायुक्त रामदास कोकारे,  सौरभ गणात्रा, डॉ.वैभव गोर्डे, संकेश भोईर, चेतन म्हामुणकर, सुजित रोकडे,
नीता देसले, रेखा तरे,ज्योती  भोईर ,निलेश सपाट 
तसेच विविध क्षेत्रातील  नागरिकांनी हजेरी लावली असून   पाचव्या वर्षात पदार्पण करीत  असल्याने  शुभेच्छा दिल्या.


 हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक, सांस्कृतिक,  शैक्षणिक  उपक्रम आम्ही  रबिविले असून या  वर्षीही आम्ही समाजउपयोगी  कार्यक्रम हाती घेऊ असे हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष सचिन राऊत  यांनी बोलतांना सांगितले. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हेलपिंग हॅन्ड सामाजिक संस्थेचे  अध्यक्ष सचिन राऊत ,संगिता साबळे ,संतोष भोईर ,संकेत गाडेकर ,तुषार धांडे ,विकास वानखेडे , आझाद मुल्ला यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments