भिवंडी (प्रतिनिधी ) एका महिलेची मैत्रीण असलेल्या बंटी बबली यांनी आपल्या मैत्रिणीचा विश्वासघात करीत घरात ठेवलेले 6 लाख 83 हजार रुपयांचे 42 तोळे सोने व 90 हजार रोख असा 7 लाख 73 हजार रुपयांची चोरी करून पळून गेलेल्या बबलीला नारपोली पोलीसांनी गोवा येथून ताब्यात घेतले आहे .मोनालीशा पंकज रॉय वय 26 रा .सुरत असे अटक बबली चे नाव असून तिचा लिव्ह अँड रिलेशन मध्ये राहणार बंटी प्रेमचंद भारती वय 28 रा .दिल्ली हा फरार आहे.
कशेळी येथील एका इमारती मध्ये दिशा रवींद्र लखाणी या वास्तव्यास असून त्यांची मैत्रीण मोनालीशा पंकज रॉय व तिचा पती प्रेमचंद भारती हे फ्लॅट भाड्याने घेण्यासाठी येऊन पाच दिवस तिच्या सोबत तिच्याच फ्लॅट मध्ये राहिले. त्या दरम्यान एका रात्री चौघांनी पार्टी करून मद्यसेवन केले असता त्याचा फायदा घेत बंटी बबली यांनी दिशा लखाणी यांच्या कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरी करून दोघांनी दुसऱ्या दिवशी तेथून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी चोरी झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर त्यांनी नारपोली पोलीस ठाण्यात या बाबत तक्रार दाखल केली .
नारपोली पो ठाण्याचे वरिष्ठ पो निरी मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने गुप्त बातमीदार व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास केला असता आरोपी हे गोवा येथे असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस पथकाने तात्काळ तेथे जात महिला आरोपी मोनालीशा पंकज रॉय हिस मरोर, सालीगाव गोवा येथून ताब्यात घेत तिच्या जवळून 26 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात यश मिळविले असून नारपोली पोलीस फरार आरोपी प्रेमचंद भारती याचा शोध घेत असून महिला आरोपीस 9 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे .
0 Comments