भिवंडीत तहसीलदारांची अनधिकृत रेती माफियांवर कारवाई 30 लाखांचे बार्ज जप्त

 


भिवंडी: दि.04 (प्रतिनिधी )  ठाणे जिल्ह्या तील अनधिकृत रेती उत्खनना वर कारवाई करण्याचे आदर्श जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिक्या नंतर कल्याण ठाणे भिवंडी भागातील रेती माफियांवर कारवाई करण्यास सुरुवात केली गेली आहे .भिवंडी उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या आदेशाने भिवंडी तहसीलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाच्या पथकाने पिंपळास ते कोनगाव खाडी किनारी कारवाई करीत 30 लाख रुपयांचे तीन बार्ज जप्त केले आहेत.


मौजे पिंपळास ते कोन या खाडी किनारी मंडळ अधिकारी खारबाव भास्कर टाकवेकर ,अप्पर मंडळ अधिकारी भिवंडी अतुल नाईक व मंडळातील कोन, वेहेळे, अंजुर, पूर्ण तलाठी या पथका कोनगाव पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक गणपत पिंगळे समवेत सकाळी  बोटीच्या सहाय्याने सदर खाडीमध्ये अनाधिकृत रित्या रेती उपसा करणाऱ्या सक्शन पंप व बार्ज वर कार्यवाही करण्यास सुरुवात केली असता गोवा-पिंपळास या खाडी पात्रात 3 बार्ज आढळून आले.


परंतु कारवाई पथकाची चाहूल लागताच बार्ज वरील व्यक्तींनी पलायन केले .त्यानंतर महसूल विभागाच्या पथकाने खाजगी हायड्रो च्या साह्याने 30 लाख किमतीचे तिन्ही बार्ज खाडी किनारी शेतात काढून सील करीत स्थानिक पोलीस पाटील यांचे ताब्यात देण्यात आले आहेत.
कोनगाव पोलीस ठाण्यात बार्ज मालक  व कामगार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार अधिक पाटील यांच्या कारवाई मुळे  रेती माफियां मध्ये मोठी खळबळ उडाली आहे .

Post a Comment

0 Comments