शुगर कॉस्‍मेटिक्‍सची महिला दिन मोहिम #WhenIAmReady मध्‍ये शार्क विनीता सिंगसह ५१०० हून अधिक महिलांचा सहभाग; व्‍यापक ३८ दशलक्षहून अधिक पोहोच संपादित!

■महिला दिनानिमित्त महिला त्‍यांच्‍या जीवनातील ध्‍येये संपादित करण्‍यासाठी अपेक्षित पूर्व-निर्धारित रूढींना कशाप्रकारे मोडून काढत आहेत याबाबत जागरूकता निर्माण करण्‍यासाठी #WhenIAmReady मोहिम सुरू करण्‍यात आली...


मुंबई - २७ मार्च २०२२ :   शुगर कॉस्‍मेटिक्‍स या भारतातील झपाट्याने विकसित होणा-या ब्‍युटी ब्रॅण्‍डने महिला दिनानिमित्त त्‍यांची #WhenIAmReady मोहिम (https://www.instagram.com/explore/tags/wheniamready/) सुरू केली.


           सोशल मीडियावर, प्रामुख्‍याने इन्‍स्‍टाग्रामवर सुरू झालेली ही मोहिम ३८ दशलक्षहून अधिक

युजर्सपर्यंत पोहोचली आणि हा महिनाखेरपर्यंत ५० दशलक्षहून अधिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्‍याची अपेक्षा आहे. या मोहिमेने आज महिला त्‍यांच्‍या वैयक्तिक जीवनातील आवडींसाठी कशाप्रकारे सामाजिक रूढींना मोडून काढत आहेत याबाबत जागरूकता निर्माण करणारे व्‍यासपीठ दिले.  


        या सोशल मीडिया उपक्रमामध्‍ये #WhenIAmReady हॅशटॅगचा वापर करून इन्‍स्‍टाग्रामवर एकूण ५१४२हून अधिक पोस्‍ट्स दिसण्‍यात आल्‍या. शुगर कॉस्‍मेटिक्‍सच्‍या सह-संस्‍थापक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी शार्क विनीता सिंग यांनी देखील या मोहिमेमध्‍ये सहभाग घेतला आणि पूर्व-निर्धारित सामाजिक रूढींना मोडून काढण्‍याच्‍या त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या गाथेला सादर केले. (https://www.instagram.com/p/Ca1Gdyxoepp/)  


         या मोहिमेच्‍या यशाबाबत बोलताना विनीता सिंग म्‍हणाल्‍या, ''शुगर कॉस्‍मेटिक्‍स हा एक ब्रॅण्‍ड आहे, जो प्रबळ, स्‍वावलंबी महिलांना प्रशंसित करतो आणि यंदा आंतरराष्‍ट्रीय महिला दिन साजरा करण्‍यासाठी आमचा या महिलांना, विशेषत: आपल्‍या जीवनातील निवडींबाबत चिंतित असलेल्‍या महिलांना कोणत्‍याही सामाजिक दबावाला बळी न पडता साहसी बनण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याचा प्रयत्‍न होता.


Post a Comment

0 Comments