कल्याण : कल्याण येथील अविनाश ओंबासे यांना आदर्श क्रीडा पत्रकारिता तर भिवंडी येथील गुणवंत बेलखेडे यांना आदर्श क्रीडाशिक्षक या राज्यस्तरीय पुरस्काराने गौरविण्यात आले. गुणवंत बेलखेडे हे गेले पंचवीस वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक राष्ट्रीय राज्य खेळाडू घडले आहेत. तर अविनाश ओंबासे गेली बावीस वर्ष क्रीडा पत्रकारिता करत असून त्यांनी शासनाच्या अनेक योजना, धोरण, उपक्रम आणि क्रीडा क्षेत्रातील समस्या यावर सडेतोड लिखाण केलेले आहे.
राज्य पुरस्कार सोहळा महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ आणि हस्ती पब्लिक स्कूल दोंडाईचा जिल्हा.धुळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या मध्ये राज्यस्तरीय आदर्श क्रीडा शिक्षक, संघटना मार्गदर्शक व आणि पत्रकारिता हे पुरस्कार अर्जुन पुरस्कारथी आणि ऑलिंपियन खेळाडू काका पवार यांच्याहस्ते वितरण करण्यात आले.
या प्रसंगी महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाचे उपसंचालक चंद्रकांत कांबळे, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोतकर, महाराष्ट्र शासन औद्योगिक उद्योग सहाय्यक आयुक्त देवीदास गोरे, हस्ती उद्योग समूहाचे अशोक जैन व कैलास जैन, क्रीडा उपसंचालक सुनंदा पाटील, जिल्हाक्रीडाधिकारी आसाराम जाधव, प्रो.कबड्डी राष्ट्रीय खेळाडू महेंद्र राजपूत, खो-खो चे डॉ आनंद पवार, शा. शि.मंडळाचे सहसचिव शिवदत्त ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments