टिटवाळा येथे राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन

■राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते झाले उद्घाटन...


कल्याण : प्रभाग क्रमांक दहा टिटवाळा येथील वार्ड अध्यक्ष मोरेश्वर तरे यांचे जनसंपर्क कार्यालय आर. के. नगर मध्ये सुरू करण्यात आले असून राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या हस्ते या जनसंपर्क कार्यालयाचे, जेष्ठ नागरिक कार्यालय आणि वृत्तपत्र वाचनालयाचे उदघाटन करण्यात आले. 


          यावेळी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय समन्वयक पारसनाथ तिवारीकल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष संदीप देसाई,  उपाध्यक्ष विनायक काळण, वार्ड क्रमांक दहा अध्यक्ष मोरेश्वर तरे,  अल्पसंख्याक विभाग जिल्हा अध्यक्ष अकबर शेखमुस्ताफा सय्यद योगेश माळी, अदिवासी संघटना अध्यक्ष विष्णू वाघे आदी मान्यवर उपस्थित होते.


       यावेळी जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी सांगितले की, भाषण कमी परंतु काम जास्त अशी व्यक्ती मोरेश्वर तरे आहेत. येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी मोरेश्वर तरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे व आपल्या प्रभागाचा विकास  करण्यासाठी  मोरेश्वर तरे सारखा लोकप्रतिनिधी निवडून दिला पाहिजे असे आवाहन केले.   


        राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार वयाच्या ८२ व्या वर्षी देखील तरुणांना लाजवेल असे पायाला भिंगरी बाधून जनतेचे काम करीत आसतात.  दूरदृष्टी असलेला एकमेव नेता आहे. अशा नेत्यांच्या पाठीशी तरुणांनी उभे राहिले पाहिजेमहीलांना पंन्नास टंके आरक्षण मिळावे महणून शरद पवार यांनी पाठपुरावा केला असल्याचे  सांगितले.


तसेच यावेळी आर के नगर मधील नागरिकांनी वार्ड अध्यक्ष मोरेश्वर तरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैध यांनी केले तर सुत्रसंचालन सागर वाभळे यांनी केलेआभार प्रदर्शन अँड महेंद्र हाडवले यांनी केलेयावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कल्याण पश्चिम प्रवक्तेपदी सागर वाभळे यांची नियुक्ती करण्यात आली.

Post a Comment

0 Comments