भिवंडी शहरा लगतच्या खोणी गावात सशस्त्र दरोडा ,वयस्क महिलेच्या गळ्यावर सुरा ठेवत अंगावरील दागिन्यांची लूट ,पलायन करतानाची दृश्य सीसीटीव्हीत कैद...


भिवंडी दि 2 (प्रतिनिधी ) शहराला लागून असलेल्या खोणी या गावात मध्यरात्रीच्या सुमारास एका घरावर सशस्त्र 5 दरोडेखोरांनी दरोडा टाकला असून एक खोलीत झोपलेल्या वयस्क महिलेच्या गळ्यावर सूरा ठेवत तिच्या अंगावरील दागिने अक्षरशः ओरबाडून पोबारा केला आहे खोणी गावातील अँड अजय विष्णू पाटील हे आपल्या पत्नी मुला सह एका खोलीत तर त्यांची आई नंदा व सहा वर्षांची मुलगी ही दुसऱ्या खोलीत झोपले असता रात्री अडीच वाजताच्या सुमारास आलेल्या दरोडेखोरांनी प्रथम अजय पाटील यांच्या कार्यालयाची कडी कोयंडा तोडून कार्यालयात प्रवेश केला.


         परंतु तेथे काही मिळून न आल्याने दरोडेखोरांनी आपला मोर्चा पहिल्या मजला वरील घरातवळवला तेथील  सुद्धा दरवाजाच्या आतील कडी कशाच्यातरी साहाय्याने उचकटून आई नंदा झोपलेल्या खोलीत ते शिरले व त्यांच्या गळ्यावर सुरा ठेवत कानातील कर्णफुले खेचून काढली तर गळ्यातील गंठन व हातातील बांगड्या हिसकावून घेत असताना महिलेला मला मारू नका तुम्हाला काय न्यायचे ते न्या अशी आर्जव केली .त्याच वेळी त्यांची सून उठल्याने व तिने घरातकही व्यक्ती आल्याचे पाहून जोरजोरात आरडाओरड केल्याने परीसरातील नागरीक उठविण्यास सुरवात केल्याने दरोडेखोरांनी पलायन केले.            काही युवकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सोबत रस्सीने बांधून आणलेले दगड ग्रामस्थांवर भिरकावीत पलायन केले .भयभीत कुटुंबीयांनी स्थानिक निजामपुरा पोलिसांना घटनेची माहिती दिली असता रात्र गस्त करीत असलेले दोन पोलीस एक तासाने येऊन गेले परंतु त्यांनी सकाळी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी येण्याचा सल्ला देत निघून गेले .या मुळे स्थानिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.


           काढण्यास खेचाखेची केली असता घरातील कुटुंबीय झोपले असता 2.30 वाजताच्या सुमारास आलेल्या 5 दरोडेखोरांनी कडी कोयंडा तोडून घरात शिरून वयस्क महिलेच्या अंगावरील सुमारे 9 तोळे सोन्याचे दागिने ओरबाडून नेले . कुटुंबीय भायभीत झाले आहेत.
दरोडेखोर नजीकच्या सीसीटीव्ही मध्ये कैद.
पोलिसांना कळविल्यावर घटनास्थळी येऊन बघून निघून गेले.

Post a Comment

0 Comments