एनसीपीईडीपीचा यूनेस्कोसह सहयोग

■'सर्वसमावेशक शिक्षण' थीमवर व्हर्च्युअल साइड-इव्हेण्टचे आयोजन


मुंबई, २७ मार्च २०२२ : नॅशनल सेंटर फॉर प्रमोशन ऑफ एम्प्लॉयमेण्ट फॉर डिसॅबल पीपल (एनसीपीईडीपी) या क्रॉस-डिसॅबिलिटी, ना-नफा तत्त्वावर आधारित संस्‍थेने यूनेस्को, नवी दिल्लीसोबत सहयोगाने ग्लोबल डिसॅबिलिटी समिट (जीडीएस २०२२)च्‍या थीम्सपैकी एक 'सर्वसमावेशक शिक्षण' या थीमवर व्हर्च्युअल साइड-इव्हेण्टचे आयोजन केले.

    या व्हर्च्युअल इव्हेण्टचा उद्देश दक्षिण-आशियाई दृष्टीकोनाच्या माध्यमातून विकलांग मुलांच्या सर्वसमावेशक शिक्षणावर कोविड-१९ चा परिणाम समजून घेण्याचा होता. तसेच या इव्हेण्टचा प्रदेशामधील विकलांग विद्यार्थ्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षणामधील प्रमुख समस्या व आव्हाने जाणून घेण्याचा मनसुबा होता. ऑनलाइन शिक्षणाच्या खात्रीसाठी तंत्रज्ञान सर्वांना समप्रमाणात उपलब्ध करून देण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. विकलांग विद्यार्थ्यांना सर्वसमावेशक शिक्षण देण्यासंदर्भात सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब आणि दक्षिण आशियामधील एसडीजी ४ लक्ष्‍य संपादित करण्याप्रती प्रादेशिक यंत्रणा व पद्धती आखण्यासाठी शिफारसी सुचवण्याबाबत चर्चा करण्यात आली.


      यूनेस्को नवी दिल्लीच्या शिक्षण विभागाचे प्रमुख जॉईस पोएन म्हणाले, "शाळा सतत बंद असल्यामुळे शिक्षणाचे झालेले नुकसान पाहता विकलांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरील परिणाम अधिक काळजीत टाकणारा राहिला आहे. आपल्याला एसडीजी ४ प्रती प्रगतीला चालना देण्यासाठी आणि सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी ते सर्वसमावेशक व समान असण्याची खात्री घ्यावी लागेल."


      एनसीपीईडीपीचे कार्यकारी संचालक श्री. अरमान अली म्हणाले, "महामारीने आपल्याला दशक काळ मागे नेले आहे आणि सर्वांचा सहभाग असण्यासोबत समान सहभागाची संधी देणा-या सर्वसमावेशक शिक्षणाबाबत पुनर्विचार करण्याची ही महत्त्वपूर्ण वेळ आहे. जीडीएस२०२२ ने आपल्याला एकत्र येत एसडीजी ४ च्या ध्येयाला प्रगत करण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी साऊथ एशियन रिजिनल यंत्रणा निर्माण करण्याची संधी दिली आहे."

Post a Comment

0 Comments