केडीएमसी आयुक्तांनी केली कल्याण पूर्वीतील शभंर फुटी रस्त्याची पाहणी

                                      


कल्याण :-  सोमवारी केडीएमसी  आयुक्‍त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी कल्याण पूर्व विभागातील श्रीमलंग रस्ता व श्रीमलंग रस्त्याने उल्हासनगर हद्दीपर्यंत शंभर फुटी रस्त्याची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यादरम्यान कार्यकारी अभियंता सुनील जोशी, नगररचना विभागातील नगररचनाकार राजेश मोरे, आय प्रभागाचे सहा.आयुक्त संजय साबळे तसेच संबंधित उप अभियंता उपस्थित होते.


महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी श्रीमलंग रस्ता ते उल्हासनगर नगर हद्दीपर्यंत असलेल्या रस्त्यामध्ये फ्रेंड्स सोसायटी बाधित होत असल्याने सोसायटी मधील नागरिकांचे तसेच बाधीत भूखंडधारकांचे म्हणणे ऐकून घेतले, सदर रस्त्याच्या रूपरेषेबाबत नियमानुसार येत्या ८ ते १० दिवसात निर्णय घेण्यात येईल.


त्याप्रमाणे या रस्त्याचे पुढे चिंचपाडा पर्यंत रुंदीकरण झाल्या नंतर सदर रस्त्यावरुन होणारी वाहतूक/दळणवळण मोठया प्रमाणात व सुलभपणे होऊ शकेल, त्याप्रमाणे उल्हासनगर वरुन पुणे किंवा मुंबई कडे जाणा-या नागरिकांनी रस्ता रुंदीकरणानंतर या रस्त्याचा वापर केल्याने कल्याण शिळरोड वरील वाहतूकीचा ताण कमी होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली .

Post a Comment

0 Comments