देर आये दुरुस्त आये - आमदारांच्या घराबाबत जितेंद्र यांच्या ट्विट वर मनसे आमदार राजू पाटील यांची प्रतिक्रिया

■आमदारांना घरे देण्यापेक्षा सर्वसामान्यांना २०० युनिट मोफत वीज देण्याची केली मागणी  


कल्याण , कुणाल  म्हात्रे   राज्यातील सर्वपक्षीय आमदारांसाठी म्हाडाची ३०० घरे देण्याची घोषणा काल विधानसभेत करण्यात आली. या निर्णयानंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी आमदारांना मोफत घरे कशासाठीत्यापेक्षा सर्वसामान्यांना २००  युनिट मोफत वीज द्या व जनतेचे आशिर्वाद मिळवा असं ट्विट केलं होतं.

याबाबत बोलताना राजू पाटील यांनी अशा घोषणांची आवश्यकता नाही, आपल्या प्रायोरिटी काय आहेत ते आधी बघा, घोषणा हे करतात टीका करणारे सरसकट आमदारांना शिव्या घालतात, घरे कोणी मागितले होते असा काही प्रस्ताव आहे का अशा गोष्टींमध्ये न जाता प्रायोरिटी काय आहेत त्या  द्यायला पाहिजे. हा खर्च इतर ठिकाणी करु शकतो, कोरोनाचे निमित्त सांगून तिजोरी खाली झाली असं बोलायचं आणि दुसरीकडे असं घर वाटत सुटायचे याला काही अर्थ नाही अस सांगितलं.
तर जितेंद्र आव्हाड यांनी ही घरे मोफत देण्यात येणार नसून अपेक्षित खर्च 70 लाख असल्याचं ट्विट केलं होतं .याबाबत बोलताना मनसे आमदार पाटील यांनी हे म्हणजे देर आये दुरुस्त आहे मात्र ही स्कीम  कॅन्सल केली पाहिजे. ज्याला  घ्यायचे तो घेईल, आमदारांना भत्ते वगैरे पकडून ३ लाख पगार दिला जातो तो काय कामाचामाझ्या माहितीप्रमाणे ८५ ते ९०  टक्के आमदार हे कोट्याधीश आहेत.  गरजू आमदार आहेत त्यांची परिस्थिती नाही अशांना मोफत द्या हरकत नाही मात्र ते दोन तीन आमदार असतीलतीनशे आमदारांना घरे वाटण मला पटत नाही असं स्पष्ट केलं. 

Post a Comment

0 Comments