कल्याण : जागतिक महिला दिनाच्या संध्येस कल्याण पूर्व शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक आशा रसाळ यांना कल्याण पुर्वेतील फुड किंग डायनिंग अँन्ड बारच्या दर्शनी भागावर सावित्रीबाई फुलेचे छायाचित्र लावले असल्याचे समजले. त्यांनी याची तातडीने दखल घेत आशा रसाळ यांनी आपल्या रगरागिणीसह फुड किंग डायनिंग ॲण्ड बार, येथे जात आक्षेप घेत विचरणा करीत व्यवस्थापनास दर्शनी भागातील सावित्रीबाई फुलेचे चित्र काढण्यास भाग पाढले. शिवसेनेच्या रगरागिणीच्या या दक्षतेचे सामाजातील सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.
महिला दिनाच्या दिवशी कल्याण पूर्वेतील विजय नगर येथील फुड किंग डायनिंग ॲण्ड बार, पूर्वीचा राज पॅलेस वर बाराच्या प्रथम दर्शनी भागावर सावित्रीबाई फुलेंच छायाचित्र लावून आत मध्ये बार सुरू होता. ग्राहक दारू पित होते. कल्याण पूर्वेच्या शिवसेना महिला आघाडी उपशहर संघटक आशा रसाळ यांना समजताच त्यांनी कल्याण विधानसभा संघटक राधिका गुप्ते, उपशहर संघटक भारती जाधव, उपशहर सहसंघटक नंदा सावंत, ऋतुकांचन रसाळ यांच्यासहीत फुड किंग डायनिंग ॲण्ड बार वर धडक देऊन सावित्रीबाईंचे छायाचित्र बार वर लावल्याबद्दल तीव्र आक्षेप घेत बार मालकाला शिवसेनेचा हिसका दाखवत सावित्रीबाई फुलेंच छायाचित्र बार मालकाला काढायला लावले.
बार मालकाने आणि व्यवस्थापनाने दिलगीरी व्यक्त करुन शिवसेना महीला आघाडीची जाहिर माफी मागितली व सावित्रीबाई फुलेंचे छायाचित्र त्वरीत तेथून हटवल्याने शिवसेनेच्या रगरागिणीच्या धडक भुमिकेचे परिसरात कौतुक होत आहे.
0 Comments