१५६ कारखाने स्थलांतरीत करण्याच्या निर्णय घेण्या अगोदर चर्चा करा कामा संघटनेची राज्य सरकारला विनंती


डोंबिवली ( शंकर जाधव ) राज्य सरकारने डोंबिवलीतील १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याच्या विचारावर आहे असल्याच्या बातम्या आल्यावर कारखानदारांनी कामा संघटनेशी संपर्क साधून माहिती घेतली.अद्याप कोणतेही पत्र शासनाने कारखानदारांनाना पाठवले नसल्याचे सांगितले.याबाबत राज्य सरकारने निर्णय घेण्याअगोदर संघटनेला चर्चेला बोलावे आणि त्यातून काही पर्याय काढता येऊ शकतो अशी विनंती संघटनेशी केली आहे.


        डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने सोमवारी कामा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर वार्तालाप ठेवण्यात आला.१५६ कारखाने स्थलांतरीत करण्याचा राज्य सरकारच्या भूमिकेवर कामा संघटनेची भूमिका या विषयावर  वार्तालाप आयोजन केले आहेत.यावेळी संघाचे अध्यक्ष महावीर बडाला यांनी कामा संघटनेचे अध्यक्ष डॉ. देवेन सोनी, उद्य वालावलकर,श्रीकांत जोशी आणि राजू बैल्लूर यांचा थोडक्यात परिचय करून दिला तर महिला पत्रकार राजलक्ष्मी पुजारे – जोशी यांनी वार्तालापाच्या विषय सांगितला.


      सुरुवातीला अध्यक्ष डॉ. सोनी यांनी १५६ कारखाने स्थलांतरीत करण्याच्या शासनाच्या निर्णयावर एकाही कारखानदाराला पत्र आले नसल्याचे सांगत  सांगितले तर कारखाने स्थलांतरीत करण्यापेक्षा दुसरा मार्ग काढत राज्य सरकारांशी संघटना चर्चा करण्यास तयार आहोत .कारखाने स्थलांतरीत करण्याआधी ते धोकादायक आहेत का याची संपूर्ण माहिती शासनाने घेणे आवश्यक आहे. डोंबिवलीतील कारखान्यातून प्रदूषण होऊ नये म्हणून सरकारच्या नियमांचे पालन केले जात आहे.

   

   कारखान्यात आग लागण्याची घटना घडल्यास आग विझविण्यासाठी एमआयडीसीने फायर  हायड्रेट बसविण्यात आले आहे. मात्र घटनेवेळी यात पुरेसे पाणी नसल्याने संघटना अश्यावेळी टॅकर पुरविते. याकडे एमआयडीने लक्ष द्यावे अशी कामा संघटनेची विनंती आहे.रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्र हे अनेक वर्षापासून सुरु असून त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे डॉ. सोनी यांनी सांगितले.वार्तालापाच्या शेवटी संघाचे उपाध्यक्ष प्रशांत जोशी यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.  

Post a Comment

0 Comments