आग विझविण्याचे महिलांना प्रात्यक्षिक


डोंबिवली ( शंकर जाधव ) घरातील गॅस सिलेंडरला आग लागल्यास ती कशी विझवावी यांचे प्रात्यक्षिक करून दाखविल्याबद्दल महिलांनी अग्निशमक दलाच्या जवानांचे आभार मानले. जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील राजाजी पथ येथे अश्निशामक दलाने प्रात्यक्षिक करण्याअगोदर उपस्थित महिलांना आणि विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली.आग विझवण्याआधी घ्यावयाची काळजी,आग विझवण्याचे साहित्य कसे हाताळावे आणि त्यावेळी स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे यांची माहिती देण्यात आली.


        स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळा ( रामनगर )   शिक्षिका आणि विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला. यावेळी माजी नगरसेवक मुकुंद पेढणेकर,शाळेच्या मुख्याध्यपिका शिंदे, दहीतुले,अमित टेमकर,संतोष देसाई,अग्मिशामक दलातील उपस्थानक अधिकारी रवी गोवारी, जयेश मोरे,भारत घोडे,अग्निशमन प्रणेता मारुती खिल्लारी, आणि केदार मराठे आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments