डोंबिवली, डोंबिवली शहरात प्लॅन्ट अँड एनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉझ ) संस्थेच्या वतीने महाशिवरात्रीत जे शिवभक्त शंकराच्या पिंडीवर दूध ओतून दर्शन घेतात ते दुध वाया जाऊ नये याकरिता या संस्थे मार्फत गेले सहा वर्षांपासून डोंबिवलीत पूर्व व पश्चिम येथील शिव मंदिरात जाऊन दूध जमा करतात ते फिल्टर करून वृद्धाश्रम, अनाथालय मधील मुलांना आणि रस्त्यावरील भटके कुत्रे, मांजरे याना दूध दिल जात आहे.
हा उपक्रम संस्थेचे अध्यक्ष निलेश भणगे व त्यांच्या टीमने गेली सहा वर्षांपासून सुरू केला आहे यामुळे ह्या कार्याच सर्वत्र स्वागत केलं जात आहे. हे सातवे वर्ष आहे आणि ह्या वर्षी ही पॉज च्या साधना सभरवाल ह्यांनी हा उपक्रम चालू ठेवला आहे.
ह्या वर्षी विविध रोटरॅक्ट क्लब नि व्हाइट रिव्हॉलुशन म्हणून हा उपक्रम चालवला आहे.२५ लिटरच्या वर दूध सुरभी मिश्रा आणि रॉटरॅक्ट क्लब ऑफ भारत कॉलेज ह्यांनी गोळा केले.या कार्यक्रमात आर के वृद्धाश्रमने भाग घेतला होता. राजेंद्र ह्यांची टीमने पिंपळेश्वर आणि खिडकाळी मंदिरात दूध गोळा केले. आतापर्यंत 300 लिटर दुध जमा झाले.
0 Comments