डोंबिवली पोलीस ठाण्यासमोर भाजपचे लाक्षणिक उपोषण...

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) २८ फेब्रेवारी रोजी भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरचीची पुढ टाकून बेदम मारहाण केली.यात कटके गंभीर जखमी झाले असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.कटके यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत हल्लेखोरांना लवकरात लवकर अटक करा अशी मागणी भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी केली होती.मात्र पोलीस तपास वेगळ्या दिशेने आणि संथ गतीने सुरु असल्याचा आरोप करत मंगळवारी भाजपने लाक्षणिक उपोषण केले.सुरुवातीला पोलीस ठाण्यात उपोषण करण्यासाठी आलेल्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी मज्जाव केल्याने कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोरच उपोषणास बसले.

 

        डोंबिवली शहरात गुंडांची दहशत वाढत आले हे सत्य पोलीसहि नाकारू शकत नाही.सोनसाखळी चोरी, महिलांची  छेड काढणे, भररस्त्यात मारणारी असे प्रकार घडत असल्याने येथील नागरीक भयभीत झाले आहेत.काही दिवसांपूर्वी शेलार चौकात भर गुंडांनी हवेत गोळीबार केल्याचा भयानक प्रकार घडला होता.डोंबिवली सारख्या सुसंस्कृत शहरात आहे प्रकार वाढत चालल्याने डोंबिवली शहरात पोलीस करतताय तरी काय ? आम्ही सुरक्षित आहोत का ? असा प्रश्न येथील नागरिक गृह्खात्यांचे मंत्री दिलीप –वळसे पाटील यांना विचारीत आहेत.भाजप कार्यकर्ता मनोज कटके यांच्यावर झालेल्या जीवघेणा हल्ल्यात अद्याप आरोपींना अटक करण्यास पोलिसांना यश आले नाही.


      माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कटके यांच्या तब्बेतीची विचारपूस केली.आमदार चव्हाण यांनी कटके हल्ला प्रकारात आरोपींना का अटक होत नाही याचा जाब पोलिसांना विचारला होता.मंगळवारी भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी रामनगर पोलीस ठाण्यात उपोषण करण्यासाठी जमा झाले होते. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना आत येण्यास मज्जाव केल्याने कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोर उपोषण केले.यावेळी जिल्हाध्यक्ष कांबळे म्हणाले, भाजप शांततेच्या मार्गाने उपोषण केले. कल्याण पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांची भेट घेऊनही आम्हाला उपोषण करण्यासाठी पोलीस ठाण्यात प्रवेश करू दिला नाही.पोलीस तपास संथगतीने का करत आहेत हे आम्ही आजही सांगत आहोत.उपोषणानंतर दुपारच्या सुमारास उपोषणकर्त्यांनी सहायक पोलीस आयुक्त पाटील यांची भेट घेतली.


 चौकट


 भाजपा कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात नो इंट्री ...


    कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याने भाजपने मंगळवारी डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात उपोषण करण्याचा इशारा दिला होता.कार्यकर्ते पोलीस ठाण्यासमोर जमा झाल्यावर पोलिसांनी त्यांना आत येण्यास मनाई केली. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यासमोरच उपोषण केले.


डोंबिवलीत गुंडांराज सुरु असल्याचा आरोप

 भरदिवसा मनोज कटके यांच्यावर झालेल्या हल्ल्याने शहरात गुंडांराज सुरु आहे का असा प्रश्न भाजपाने उपस्थित केला आहे.शहरातील प्रत्येक नागरीक सुरक्षित असल्याची हमी पोलीस देऊ शकत नाही. सोनसाखळी चोरीच्या घटनेत वाढ झाली असून  पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी डोंबिवली शहरातील चार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांच्या कामाच्या दिशेबाबत विचारणा करणे आवश्यक झाले आहे.

Post a Comment

0 Comments