गुढी पाडवा दिनी श्री गणेश मंदिर संस्थेचा नाविन्यपूर्ण उपक्रम कोरोनाने मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांना मदत

  


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे दोन वर्षे सण-उत्सव साधेपणाने साजरे झाले. २०२२ साली करोनाची तिसरी लाट ओसरल्याने श्री गणेश मंदिराने गुढीपाडवा दिनी  दरवर्षीप्रमाणे नववर्ष स्वागत यात्रा काढणार आहेत.संस्थेच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान   मात्र गेली दोन वर्षे कोरोनामुळे शोभायात्रा काढता आली नाही. 


            कोरोना महामारीमुळे काही प्रमाणात मोकळीक मिळाली असून शासन निर्देशानुसार सण-उत्सव साजरे करण्यास परवानगी मिळाली आहे.विशेष म्हणजे कोरोनाने मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना संस्थेच्या वतीने आवश्यक मदत मिळणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष राहुल दामले यांनीपत्रकार परिषदेत  सांगितले.


           श्रीगणेश मंदिर संस्थान तर्फे शनिवार २ एप्रिल रोजी हिंदू नववर्षं स्वागतयात्रा आयोजित केली आहे. स्वागतयात्रा बाबत माहिती देण्यासाठी श्री गणेश मंदिरातील वरदविनायक सभागृहात पत्रकार परिषद घेण्यात आली. चैत्रगुढीपाडवा २४ व्या वर्षानिमित्त स्वागतयात्रा निमित्त होणाऱ्या उत्सवात विविध सामाजिक कार्यक्रम होणार असून सकाळी साडे सहा वाजता डोंबिवली पश्चिमेकडील मारुती मंदिरातून पालखी येऊन नंतर गुढी उभारण्यात येणार आहे. 


           विशेष म्हणजे यावर्षी श्रीगणेश मंदिर संस्थान माध्यमातून कोविड काळात ज्यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजाची सेवा केली त्यासर्व कोविड योद्धाचा गौरव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे संस्कर भारती कोकण प्रांत डोंबिवली पूर्व समिती तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ७५  गोल रंगोळ्यांच्या पायघड्या साकारण्यात येणार आहेत. यासाठी ७५  रांगोळी कलाकार सहभागी होणार असून त्यासाठी ८० किलो रंग आणि ३०० किलो रांगोळी साहित्य लागणार आहे. 


         याशिवाय १० धार्मिक स्थळे रांगोळीचा माध्यमातून असून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यांसमोरही रांगोळी कलाकार रांगोळ्या साकारणार आहेत अशी माहिती संस्कार भारतीचे रांगोळी कलाकार उमेश पांचाळ यांनी दिली. कोविड योद्धाचा सत्कार होईल.८ ते १२ यावेळात प्र.के. अत्रे ग्रंथालयात रक्तदान शिबिर आणि १० ते ३ या वेळेत लसीकरण शिबिर होणार आहे. 


        तसेच या निमित्ताने संस्थान तर्फे पालघर जिल्ह्यातील मोकाशी पाडा येथे उभारलेल्या मंदिरात श्री गणेश, हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा १२ व १३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मुख्य म्हणजे यावर्षी ढोल पथकांसाठी चौकाचौकात ढोल सादरीकरण करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments