जागतिक क्षयरोग दिना निमित्त केडीएमसी तर्फे रॅलीद्वारे जनजागृती


कल्याण : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त क्षयरोग नियंत्रणासाठी जनजागृती करण्यासाठी कल्याण मधील बाई रुक्मिणीबाई रुग्णालयापासून महापालिकेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी तसेच बिर्ला महाविदयालयप्रगती महाविदयालयमॉडेल महाविदयालयाचे विदयार्थी, विदयार्थिनी तसेच जन स्वराज्य सेवा फाऊंडेशनअपलिफ्ट इंडीया असोसिएशन या एनजीओजचे कर्मचारी यांची रॅली काढण्यात आली. क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी गुंतवणूक कराजीवन वाचवा ही सन २०२२ साठी जागतिक आरोग्य संघटनेची संकल्पना असून या संकल्पनेचे फलक हाती प्रदर्शित करीत हि रॅली काढण्यात आली.


        महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वैदयकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली. यावेळी मुख्य वैदयकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. समीर सरवणकरटि.बी. कंट्रोल सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते.


       हि रॅली बाई रुक्मिणीबाई रुग्णालयापासून आग्रा रोड मार्गे  सहजानंद चौकातून सुभाष मैदान येथे येवून रॅलीची सांगता झाली. यावेळी डॉ. समीर सरवणकर व टि.बी. कंट्रोल सोसायटीचे जितेंद्र चौधरी यांनी  टि.बी.ची लक्षणेत्यावर करावयाच्या उपाययोजना याबाबत उपस्थित विदयार्थ्यांना माहिती दिली.


       या व्यतिरिक्त २४ मार्च ते १३ एप्रिल या कालावधीत विविध जनजागृती कार्यक्रम महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणार आहेत.

Post a Comment

0 Comments