कल्याणात आमदार बांगर यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारा आंदोलन

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) हिंगोलीचे शिवसेना जिल्हा प्रमुख आणि आमदार संतोष बांगर यांनी  प्रकाश आंबेडकराबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यानी रविवारी कल्याणात आमदार बांगर यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारा आंदोलन केले.


      कल्याणात वालधुनी येथील  अशोक नगर येथे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्या प्रतिमेला काळे फासत जोडे मारा आंदोलन करून  निषेध नोंदवला. यावेळी वंचित ₹च्या कार्यकर्त्यांनी बांगर यांच्या विरोधात जोरदार  घोषणाबाजी केली. बांगर यांनी केलेल्या बेताल वक्तव्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या आहेत, शिवसेना कार्याध्यक्षकांनी  बांगर याचे जिल्हाप्रमुख पद रद्द करावे अशी मागणी यावेळी आंदोनलकर्त्यांनी केली.          बांगर यांना महाराष्ट्रातील जिथे दिसेल तिकडे काळ फासू असा इशाराही यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी दिला  आंदोलनात वंचित बहुजन आघाडी कल्याण पूर्व शहर अध्यक्ष  मनोज धुमाळ उपाध्यक्ष आणि कार्यकर्ते जय घोडे,  विजय सुरडकर, मिलिंद खैरे, रोहित डोळस, राजाभाऊ मुकद्दर सय्यद यांच्यासह अनेक कार्यकर्ते  सहभागी झाले होते.. 

Post a Comment

0 Comments